Lok Sabha 2019 : पुलवामा दहशतवादी हल्ला, हा तर मोदींचाच कट: कुरेशी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 18:41 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी केला आहे. यावरून मोठा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

aziz qureshi said pulwama was preplanned by narendra modi
निवडणुकीसाठी पुलवामाचा कट रचला; अझीझ कुरेशींचा आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा हल्ला घडवला : कुरेशी
  • काँग्रेस नेते अझीझ कुरेशी यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
  • मध्य प्रदेशात काँग्रेसला चांगले यश मिळण्याचा विश्वास

भोपाळ : 'फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पूर्वनियोजित कट होता', असा खळबळजनक आरोप माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अझीझ कुरेशी यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुलवामा संदर्भातील कुरेशी यांचा हा आरोप धक्कादायक मानला जात आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत नेते असलेल्या कुरेशी यांनी उत्तराखंड आणि मिझोरामचे राज्यपाल म्हणून काम केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करताना कुरेशी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात कुरेशी यांनी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळाला कसा?’. जर, सीआरपीएफच्या ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर जर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक जिंकण्याची आशा असेल, तर जनता खूप शहाणी आहे. त्यांना संगळं समजतं. जवानांच्या राखेतून जर त्यांना विजयी टिळा लावून घ्यायचा  असेल तर, या निवडणुकीत जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असे मत अझीझ यांनी व्यक्त केले आहे. भोपाळमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत पुलवामातील शहिदांसाठी तुमचे एक मत भाजपला द्या, असे आवाहन केले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना टीकेला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनीदेखील अशाच आशायचा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. तसेच समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ला कट असून, जवानांचा हाकनाक बळी दिला गेल्याचे मत व्यक्त केले होते. 

काँग्रेसचा उत्साह दुणावला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यंदा भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, अद्याप दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भाजपला तगडा उमेदवार सापडलेला नाही. भाजपकडून उमेदवारीच घोषित होत नसल्याने कुरेशी यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला पराभव समोर दिसत असल्यामुळेच त्यांच्याकडून उमेदवाराची घोषणा होत नाही, असे कुरेशी म्हणाले. मध्य प्रदेशात लोकसभेच्या २७ जागा आहेत. मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या या राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचे सरकार उलथवून लावले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशात २७ पैकी २० जागांवर काँग्रेस विजयी होईल, असा दावा कुरेशी यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी मध्य प्रदेशात अनेक कारखाने बंद पाडून तरुणांचा रोजगा हिसकावून घेतला आहे. त्यामुळे त्यांना राज्यात मते मागण्याचा अधिकार नाही, असा आरोपही अझीझ कुरेशी यांनी केला.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : पुलवामा दहशतवादी हल्ला, हा तर मोदींचाच कट: कुरेशी Description: Lok Sabha 2019 : लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी केला आहे. यावरून मोठा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
Loading...
Loading...
Loading...