Lok Sabha 2019 : ‘चौकीदार’च्या कोणत्या वक्तव्यावर राहुल गांधी यांचा माफीनामा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 17:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चोर आहे’, हे राहुल गांधी यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. या प्रकरणी राहुल यांनी सुप्रीम कोर्टात आज कोर्टाची माफी मागितली आहे.

Rahul Gandhi file photo
राहुल गांधी फाइल फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाची मागितली माफी
  • 'चौकीदारच्या वक्तव्यात कोर्टाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'
  • अमेठीतील वक्तव्यावर भाजपने दाखल केली आहे याचिका

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल डीलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चोर आहे’, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत केले होते. याप्रकरणी राहुल यांनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे. निवडणूक प्रचारा्च्या ओघात हे वाक्य बोलून गेल्याचे राहुल यांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण देताना सांगितले आहे. या प्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात तातडीची याचिका दाखल केली होती. आज, त्याची सुनावणी होती. आता यावर उद्या (मंगळवार, २३ एप्रिल) सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.

काय आहे नेमका वाद?

काँग्रेसच्या प्रचारात राहुल गांधी यांनी ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चोर आहे’, असा शब्द प्रयोग केला होता. भाजपने याची दखल घेत प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने ‘तुमच्या याचिकेचा हेतू काय आहे?’ अशी विचारणा मीनाक्षी लेखी यांना केली होती. काँग्रेस अध्यक्ष प्रचार सभांमध्ये सात्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देऊन वक्तव्ये करत आहेत, याकडे मीनाक्षी लेखी यांनी लक्ष वेधले होते. हा कोर्टाचा अवमान असल्याचे लेखी यांनी म्हटले होते.

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

गेल्या सोमवारी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने याचिका दाखल करून घेतली होती. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत स्पष्टीकरण मागवणार असल्याचे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने असे वक्तव्य कधीही केलेले नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. राफेल प्रकरणातील कोर्टाच्या  निकालाला आपल्या सोयीनुसार चुकीच्या पद्धतीने प्रचारासाठी जोडल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदतही दिली होती. त्यानंतर कोर्ट यावर विचार करेल, असे सांगण्यात आले होते. आज, राहुल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात लेखी स्पष्टीकरण देण्यात आले. राहुल यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, प्रचारात एका क्षणी जोशात येऊन मी हे वक्तव्य केले होते. त्यामध्ये कोर्टाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता.

कोठे केले होते वक्तव्य?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये १० एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी अर्ज भरल्यानंतर केलेल्या भाषणात ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चौर आहे.’ असे वक्तव्य केले होते. पण, कोर्टाने केवळ गहाळ झालेल्या कागदपत्रांच्या आधारे याचिकेवर पुन्हा फेरविचार होईल, असे सांगितले होते. राफेलची कागदपत्रे खूप गोपनीय असून त्यावर विशेषअधिकार असल्याचे सरकारचे म्हणणे कोर्टाने फेटाळून लावले होते. त्यात ‘चोकीदारच चोर आहे’ असे कोठेही कोर्टाने म्हटले नव्हते.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : ‘चौकीदार’च्या कोणत्या वक्तव्यावर राहुल गांधी यांचा माफीनामा Description: Lok Sabha 2019 : ‘आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे की, चौकीदारच चोर आहे’, हे राहुल गांधी यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. या प्रकरणी राहुल यांनी सुप्रीम कोर्टात आज कोर्टाची माफी मागितली आहे.
Loading...
Loading...
Loading...