Lok Sabha 2019: मतमोजणी ठरल्याप्रमाणेच; विरोधकांच्या मागण्या आयोगाने फेटाळल्या

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 17:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019: ईव्हीएम मशीनविषयी संशय असल्याने सुरुवातीला ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाची मोजणी करावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली होती. पण, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

election commission of India
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर आली असताना विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. ईव्हीएम मशीनविषयी संशय असल्याने सुरुवातीला ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाची पहिल्यांदा मोजणी करावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली होती. पण, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावत निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्वी नियोजित केल्याप्रमाणेच होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेससह २२ राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती. त्याचबरोबर ईव्हीएम आणि व्हॅव्हीपॅटमशीनमधील मतदानात फरक दिसल्यास संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या मतांची जुळणी करावी, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. पण, या मागण्या निवडणूक आयोगाने धुडकावून लावल्या आहेत.

 

 

काय होती विरोधकांची मागणी?

सध्या मतमोजणी व्यवस्थेमध्ये सुरुवातीला पोस्टल मतदान त्यानंतर ईव्हीएम आणि त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. विरोधीपक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर यापूर्वी ठरविण्यात आलेल्या व्यवस्थेनुसारच मतमोजणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी करताना ईव्हीएमच्या मतांची मोजणी केल्यानंतर त्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. एखाद्या मतदान केंद्रातील ईव्हीएमवरील मते आणि व्हीव्हीपॅटमध्ये नोंद झालेली मते यांच्यात जर तफावत आढळली तर, संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदानकेंद्रनिहाय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. तीदेखील फेटाळून लावण्यात आली आहे. काल (मंगळवार, २१मे) देशातील २२ विरोधीपक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतमोजणी पारदर्शी करण्याची मागणी केली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मते जुळवून घेण्यात यावीत. जेणेकरून मतदान प्रक्रिया पारदर्शी होईल, असे विरोधीपक्षांचे म्हणणे होते.

निवडणूक आयोग काय म्हणतो?

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार विरोधकांच्या म्हणण्यानुसार मतमोजणी केली तर, मोजणी प्रक्रिया खूप लांबणार आहे. त्याचा विचार करून आयोगाने हायकोर्टाच्या आदेशानुसार नियोजित प्रक्रियेनुसारच मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार मतमोजणीची सुरुवात केंद्रीय तसेच राज्य राखीव पोलिस दल, लष्कर आणि विविध सरकारी सेवांमध्ये व्यग्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतांच्या मोजणीने होते. त्यानंतर ईव्हीएमची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर व्हीव्हीपॅटमधील पावत्या जुळवून पाहण्याची प्रक्रिया केली जाईल. जर, एखाद्या मतदान केंद्रावर ईव्हीएमची मते आणि व्हीव्हीपॅटी मते जुळून आली नाहीत तर, त्या एका मतदान केंद्रासाठी व्हीव्हीपॅटची मते गृहित धरली जाणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019: मतमोजणी ठरल्याप्रमाणेच; विरोधकांच्या मागण्या आयोगाने फेटाळल्या Description: Lok Sabha 2019: ईव्हीएम मशीनविषयी संशय असल्याने सुरुवातीला ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदानाची मोजणी करावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली होती. पण, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles