Lok Sabha Results 2019: जनतेचा कौल मान्य; ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही : पवार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha Results 2019: निवडणुकीत, ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत होतं. पण, आता मशीनला दोष देणं उचित नाही. जो निकाल आहे तो मी स्वीकारला आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Sharad Pawar
शरद पवार म्हणतात निकाल मान्य   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : ईव्हीएम मशीनबाबत अनेक शंका होत्या. देशातील विविध पक्षांनी एकत्र येऊन यावर निवडणूक आयोगाची भेटही घेतली होती. देशात यापूर्वीही नेत्यांची एकहाती सत्ता आली होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी असतील किंवा डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना निवडणूक आयोग किंवा सत्ताधाऱ्यांविषयी कधीही शंका उपस्थित केली गेली नाही. या निवडणुकीत, निवडणूक आयोग असेल किंवा ईव्हीएम मशीन यांच्याविषयी लोकांच्या मनात संशयाचं भूत होतं. पण, आता निकाल लागला आहे. त्यामुळं ईव्हीएम मशीनला दोष देणं उचित नाही. जो निकाल आहे तो मी स्वीकारला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. निवडणुकांचे निकाल येत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या त्यांनी राज्यातील तसेच देशातील निकालावर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्त्यांकडून चूक झाली, असे मी म्हणणार नाही. आम्ही चांगले प्रयत्न केले. आम्हाला ११ ते १२ जागा अपेक्षित होत्या. काही जागांमध्ये आम्ही विजयाच्या जवळ पोहोचलो होतो. पण, यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्या मागे हटणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

‘पार्थसाठी जागा सोडली यात तथ्य नाही’

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी पराभवातलं अंतर खूपच कमी असल्याचं मत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. पवार म्हणाले, ‘आम्ही पिछाडीवर असलो तरी, खूप मोठ्या फरकाने पिछाडीवर नाही. गेल्या निवडणुकीत भाजपला लख्ख यश मिळालं होतं. त्यांच्या उमेदवारांचं लीड लाखांच्या घरात होतं. तसं यश आता मिळालं नाही लीड कमी झालं आहे. पण, यश हे यश असतं, हे अपयश लपवण्याचं कारण नाही.’ पार्थला संधी द्यावी म्हणून तुम्ही निवडणूक लढवली नाही यावर पवार म्हणाले, ‘मी २०१४मध्येही निवडणूक लढलो नव्हतो. मी राज्यसभेचा सदस्य आहे. माढ्याबाबत तिथे दोन गट होते त्यांच्यातच एकमत नसल्यानं, ‘तुमचं एकमत नसेल तर मी लढतो’ याचा अर्थ मी माढ्याची निवडणूक लढवणार होतो, असा नाही. पार्थसाठी जागा सोडली यात तथ्य नाही. पार्थ ज्या मतदारसंघात उभा होता. ती जागा कधीच आमची नव्हती. तेथे एक नवीन उमेदवार ट्राय करावा, असा आमचा उद्देश होता. तेथे उमेदवार उभा करून बेस तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता तो यश्सवी झाला.’

‘वंचितचा अभ्यास करावा लागेल’

राज्यात आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘वंचितचा फटका बसला की नाही, याचं गणित आम्ही अजून मांडलेलं नाही. त्याचा गांभीर्यानं अभ्यास करू. नांदेड, परभणी आणि अकोला यिथं फटका बसल्याचं दिसत आहे. विधानसभेलाही असा फटका बसणार असेल विचारत असला तर, प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळी असते. त्यामुळं विधानसभेचं असं काही सांगता येणार नाही.’ देशात भाजपला मिळालेला कौल लक्षात घेता. त्यांना इतकं मोठं यश मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. काही राज्यांत त्यांना चांगल्या जागा मिळतील अशी आशा होती. पण, हे अपेक्षित नव्हतं, असं पवार यांनी सांगितले. हिंदू-मुस्लिम मतविभागणी झाली का, याचेही विश्लेषण करावं लागेल. शेवटच्या टप्प्यात गुहेत जाऊन भगवी वस्त्रे घालण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आता त्याचा कितपत फटका बसला, हे पहावं लागले, असेही पवार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha Results 2019: जनतेचा कौल मान्य; ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही : पवार Description: Lok Sabha Results 2019: निवडणुकीत, ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत होतं. पण, आता मशीनला दोष देणं उचित नाही. जो निकाल आहे तो मी स्वीकारला आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles