Lok Sabha 2019 : ममतादीदींकडून पंतप्रधान मोदींचे दात तोडण्याची भाषा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 26, 2019 | 18:30 IST | Times Now

Lok Sabha 2019 : पश्चिम बंगालमध्ये आसनसोल येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत ममतादीदींनी पंतप्रधान मोदींना मातीची मिठाई आणि दात पाडण्यासाठी त्यात खडे पाठवू असे विधान केले.

West Bengal Chief Minister Mamata Banerjee
ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर जहाल टीका   |  फोटो सौजन्य: Times Now

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावर नाराज असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दात तोडण्याची भाषा केली आहे. ममतादीदींनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले आहे की, आम्ही मातीपासून मिठाई तयार करू आणि लाडूमध्ये जसे काजू, बेदाणे घातले जातात, तसे मातीच्या मिठाईत खडे टाकू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दात तोडण्यासाठी त्यांना पाठवून देऊ. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून बरच वादळ उठलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाक् युद्ध सगळ्यांनाच परिचित आहे. पण, मोदीं यांचे दात तोडण्याची भाषा वापरून ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर टीका ओढवून घेतली आहे.

 

 

मोदी ममतांविषयी काय म्हणाले?

ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याचे मूळ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या एका मुलाखतीमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच अभिनेता अक्षयकुमारने मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी ममता बॅनर्जींचा उल्लेख केला होता. विरोधी पक्षांमध्येही माझे खूप चांगले मित्र आहेत. ममता बॅनर्जी मला स्वतः त्यांनी निवडलेले कुर्ते आणि मिठाई भेट म्हणून पाठवतात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या विधानावर ममता बॅनर्जी नाराज होत्या. राजकीय शिष्टाचाराचा वापर मोदी राजकारणासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीला कुर्ता भेट देण्यात काय गैर आहे. आपण, दुर्गापुजेच्या काळात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना अशा भेटी देत असतो. ही माहिती उघड करून तुम्ही त्याचा राजकीय लाभ घेत आहात, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलखतीत केला होता.

काँग्रेसने साधली संधी

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आसनसोल येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत ममतादीदींनी मिठाईच्या मोदींच्या वक्तव्याला मातीची मिठाई आणि दात पाडण्यासाठी खडे असे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही पश्चिम बंगालला आले नाहीत. पण, आता निवडणुकीत मते मागण्यासाठी ते बंगालला भेट देतील.’ दरम्यान, काँग्रेसने या वक्तव्यांच्या निमित्ताने ममतांना लक्ष्य करण्याची संधी साधली. ममतादीदी आणि पंतप्रधान मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध सिद्ध झाले आहेत, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

वाक् युद्ध जुनेच

पंतप्रधान मोदी आणि ममतादीदी यांच्यातील वाक् युद्ध जुनेच आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर उघडपणे जहाल टीका यापूर्वीही केली आहे. ममतांनी यापूर्वी त्यांना ‘एक्सपायरी बाबू’ (मुदत संपलेला व्यक्ती) असे संबोधले होते. मोदी सरकारची आता मुदत संपली असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, मोदींनी ममतांचा उल्लेख स्टिकर दीदी आणि स्पीड ब्रेकर दीदी असा केला होता. केंद्रातील चांगल्या योजनांवर आपली स्टिकर चिकटवून त्या राज्याच्या योजना असल्याचे दाखवण्याचा घाट ममतांनी लावला आहे, असा आरोपी मोदींनी ममतांवर केला होता. बंगालमध्ये ४० पैकी दहा जागांवर मतदान झाले असून, त्या दहा पैकी सात जागांवर भाजप विजयी होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दिलिप घोष यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : ममतादीदींकडून पंतप्रधान मोदींचे दात तोडण्याची भाषा Description: Lok Sabha 2019 : पश्चिम बंगालमध्ये आसनसोल येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत ममतादीदींनी पंतप्रधान मोदींना मातीची मिठाई आणि दात पाडण्यासाठी त्यात खडे पाठवू असे विधान केले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola