Lok Sabha 2019 : मोदींचे हेलिकॉप्टर तपासले; आयएएस अधिकारी निलंबित

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 15:16 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : ओडिशामध्ये संबलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले आहे. तपासणी संबंधित निकषांचे पालन न केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

ias officer who inspected pm narendra modi's helicopter is suspended in odisha
मोदींचे हेलिकॉप्टर तपासणारा अधिकारी निलंबित   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • आएएएस अधिकाऱ्याने मोदींचे हेलिकॉप्टर तपासले
  • निवडणूक आयोगाकडून निलंबनाची कारवाई
  • निकषांचे पालन न केल्याने निलंबन : निवडणूक आयोग

संबलपूर (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले आहे. ओडिशामध्ये संबलपूर येथे हा प्रकार घडला असून, निवडणूक आयोगाने जनरल पर्यवेक्षकांना निलंबित केले आहे. मोहम्मद मोहसिन असे, त्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते १९९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मोहसिन यांनी काम न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या पथकाकडून नेत्यांच्या वाहनांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी किंवा झडती घेतली जात आहे. पण, त्यातही काही नियमावली आहे. ज्या नेत्याला एसपीजी सुरक्षा (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) देण्यात येत आहे. त्याच्या वाहनाला तपासणीतून सवलत असते. त्यामुळे मोहसिल यांना निलंबित व्हावे लागल्याचे सांगितल जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संबलपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची आयएएस अधिकारी मोहसिन यांच्या नेतृत्वाखाली तपासणी करण्यात आली आहे. पण, ही तपासणी नियमात बसत नसल्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांच्या अहवालानंतर मोहसिन यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पथकाने मंगळवारी ओडिशामध्ये राऊरकेलामध्ये बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती. हेलिकॉप्टरच्या आत जाऊन त्यांनी पाहणी केली होती. त्यांना पटनाईक यांच्या पथकाने पूर्ण सहकार्य केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. जोपर्यंत तपासणी होत आहे तोपर्यंत ते हेलिकॉप्टरमध्ये आतच बसून राहिले. एका रोड शोच्या निमित्ताने नवीन पटनाईक राऊरकेला येथे आले होते.

मुख्यमंत्री पटनाईक यांचे सहकार्य 

पटनाईक यांच्या पथकातील एकाने याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, मुख्यमंत्री पटनाईक जेव्हा तेथे उतरले. तेव्हा निवडणूक आयोगाच्या पथकाचे अधिकारी त्यांच्याजवळ गेले आणि मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टर आणि साहित्याची तपासणी करण्यासाठी अनुमती देण्याची विनंती केली. त्यांनी विनंती मान्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना अनुमतीदेखील दिली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक कार्यकाळात कोणाच्या वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार त्यांना असतो. त्याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा पदाशी काहीही संबंध नसतो. या निवडणुकीत मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासह केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात आली आहे. प्रधान यांचे हेलिकॉप्टर सचलमध्ये तपासण्यात आले. त्यांनीदेखील निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाला सहकार्य केले. केवळ एसपीजी सुरक्षा असलेल्या व्यक्तीला किंवा नेत्याला यातून सवलत मिळते. त्याच मुद्द्यावर मोहसिन यांना निलंबित व्हावे लागले आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : मोदींचे हेलिकॉप्टर तपासले; आयएएस अधिकारी निलंबित Description: Lok Sabha 2019 : ओडिशामध्ये संबलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले आहे. तपासणी संबंधित निकषांचे पालन न केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
Loading...
Loading...
Loading...