Lok Sabha 2019 Results: भाजप गेला पुढे; संबित पात्रा राहिले मागे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 21:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha 2019 Results: भाजपसाठी सगळीकडे आनंदी आनंद असला तरी काही ठिकाणी त्यांच्या मोठ्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. संबित पात्रा यांना ओडिशामध्ये पुरी येथे पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

bjp spokesperson sambit patra
भाजप प्रवक्ते संबीत पात्रा पराभूत   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला कौल दिला आहे. त्यामुळे मोदींचे सरकार सलग दोन वेळा संधी मिळालेले देशातील पहिले बिगर काँग्रेसी सरकार ठरले आहे. काँग्रेससाठी देशभरातील पराभव नामुष्कीजनक आहे. तर भाजपला सगळीचे संधी मिळाली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशासारख्या देशात भाजपला जिथं कधीही जागा मिळाल्या नाहीत तर, भाजपनं शिरकाव केला आहे. भाजपसाठी सगळीकडे आनंदी आनंद असला तरी काही ठिकाणी त्यांच्या मोठ्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यातलच एक नाव म्हणजे संबित पात्रा. संबित पात्रा हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्सवर भाजपची भूमिका मांडण्याचे काम ते करत असतात. पण, दुर्दैवाने त्यांना ओडिशामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

अकरा हजार मतांनी पराभव

भाजप नेते संबित पात्रा यांनी पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सत्यप्रकाश तर, बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्र रिंगणात होते. निवडणूक प्रचारावेळी पात्रा कायम चर्चेत होते. त्यांनी पक्षासाठी अनेक ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या होत्या. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, लोकसभा निवडणूक जिंकण्यात मात्र ते अपयशी ठरले. राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या पात्रा यांना बीजेडीच्या पिनाकी मिश्र यांनी ११ हजार मतांनी पराभूत केले आहे. पुरी लोकसभा मतदारसंघातील ही लढत ओडिशातील एक हायप्रोफाइल लढत होती. तीन बड्या नेत्यांमध्ये ही लढत होती. त्यात पिनाकी मिश्र यांनी बाजी मारली. मिश्र आणि पात्रा यांच्यातील मतांचे अंतर ११ हजारांचे आहे. यावरूनच लढत किती चुरशीची झाली याचा अंदाज येत आहे. ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाच वेळी झाली. निवडणुकीपूर्वी पात्रा यांना विधानसभा निवडणुकीत उतरवून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण, अखेर त्यांना पुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले.

केवळ ११ हजार मतांनी पराभव

संबित पात्रा यांना पिनाकी मिश्र यांनी ११ हजार मतांनी पराभूत केले. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा आहेत. त्यात कधी नव्हे ते भाजपला आठ जागांवर विजय मिळवता आला. तर उर्वरीत १३ जागा ओडिशाच्या बिजू जनता दलाला मिळाल्या आहेत. ओडिशामध्ये जागा मिळवणे हे भाजपसाठी मोठ्या विजयासारखेच आहे. ओडिशासह पश्चिम बंगालमध्येही भाजपने शिरकाव केला असून, त्यांना तेथे १६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ओडिशा आणि बंगालमधील भाजपचे यश उल्लेखनीय मानले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 Results: भाजप गेला पुढे; संबित पात्रा राहिले मागे Description: Lok Sabha 2019 Results: भाजपसाठी सगळीकडे आनंदी आनंद असला तरी काही ठिकाणी त्यांच्या मोठ्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. संबित पात्रा यांना ओडिशामध्ये पुरी येथे पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles