Lok Sabha 2019 Results: फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा सिक्कीममध्ये लाजिरवाणा पराभव

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 27, 2019 | 12:33 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 Results: भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतियाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. भुतिया दोन ठिकाणांवरून निवडणूक लढवत होता. त्या दोन्ही ठिकाणांवर त्याला वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं.

Bhaichung Bhutia File Photo
बायचुंग भुतियाला मिळाली फक्त ७० मते   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : भारतात अनेक खेळाडूंनी खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात नशीब आजमावले. त्यात काही जण यशस्वीही झाली तर, काहींच्या पदरी निराशा आली. किर्ती आझाद, मोहम्मद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजकारणात थोडेफार यश मिळवले तर, मोहम्मद कैफला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत दिल्लीमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं विजय मिळवला तर, सिक्कीममध्ये भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतियाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. भुतिया दोन ठिकाणांवरून निवडणूक लढवत होता. त्या दोन्ही ठिकाणांवर त्याला खूप वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. एका ठिकाणी तर बायचुंगला केवळ ७० मते मिळाली आहेत तर, दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये त्याचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या पराभवानंतर बायचुंगने प्रतिक्रिया दिली असून, फुटबॉल काय आणि राजकारण काय दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत, असं त्यानं म्हटलंय.

दोन्ही ठिकाणी डिपॉझिट जप्त 

बायचुंग भुतिया भारतातील एक उत्तम फुटबॉलपटू होता. भारतीय संघाचं नेतृत्व करताना बायचुंगच्याच काळात भारतीय फुटबॉलला ग्लॅमर प्राप्त झालं. पण, हेच ग्लॅमर त्याला राजकारणात मिळालं नाही. किंबहुना फुटबॉलच्या ग्लॅमरचा उपयोग त्याला राजकारणात झाला नाही. बायचुंगला एका मतदारसंघात केवळ ७० मते मिळाली आहे. हा निकाल केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर, सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. बायचुंगने गेल्या वर्षी एप्रिल २०१८मध्ये राजकारणात स्वतः संघर्ष करण्याची घोषणा केली होती. त्याने यापूर्वी तृणमूल काँग्रेसकडून निवडणुका लढवल्या होत्या. पण गेल्या वर्षी त्याने त्याने 'हमरो सिक्किम पार्टी' या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे त्याच्यासाठी निवडणूक जास्तच आव्हानात्मक होती. त्याने कोणाविरोधात आपली भूमिका असेल किंवा कोणा विरोधात आपला संघर्ष असेल, याची कसलीच घोषणा केली नव्हती. सिक्कीमच्या आगामी लोकसभा निवडणुकीत ब्लॅक मनी आणि क्लीन मनी असा संघर्ष असेल, असे बायचुंग म्हणाला होता. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल सिक्कीमसाठी धक्कादायक होते. सिक्कीमच्या मुख्यमंत्रिपदाची पाच वेळा धुरा सांभाळलेल्या मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना विरोधीपक्ष सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने पराभूत केले.

तिसऱ्यांदा पदरी पराभवच

दुसरीकडे बायचुंगने गंगटोक आणि तमेन या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्याचे डिपॉझिट जप्त झाले. फुटबॉलच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या बायचुंगला गंगटोकमध्ये केवळ ७० मते मिळाली. सिक्कीम राज्यात लोकसभेच्या ३२ जागा आहेत. त्यात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने १७ जागांवर विजय मिळवला तर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला १५ जागांवर विजय मिळाला. बायचुंगने २०१४मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१६मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा रंगणातही त्याने तृणमूलकडूनच नशीब आजमावले होते. दोन्ही वेळा पराभव झाल्यामुळे त्यानं स्वतःचाच पक्ष काढण्याचा निर्णय घेतला मात्र, त्या पक्षालाही लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 Results: फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा सिक्कीममध्ये लाजिरवाणा पराभव Description: Lok Sabha 2019 Results: भारताचा माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतियाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. भुतिया दोन ठिकाणांवरून निवडणूक लढवत होता. त्या दोन्ही ठिकाणांवर त्याला वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles