Lok Sabha 2019 Results: पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ; भाजप ममता दीदींचं सरकार ९० दिवसांत पाडणार?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 21:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha 2019 Results: बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. भाजप नेत्याने येत्या ९० दिवसांत ममतांचे सरकार पडेल, असे सांगितले आहे.

Mamata Banerjee
पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत   |  फोटो सौजन्य: PTI

कोलकाता : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजपची विशेषतः पक्षाध्यक्ष अमित शहा यांची नजर पश्चिम बंगालवर होती. ज्या राज्यात भाजपला कधीच संधी मिळाली नाही तेथून जागा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यात अमित शहा आणि भाजप यशस्वी ठरले आहेत. निवडणुकी दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सत्तांतर होण्याचे भाकीत सांगितले होते. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या सगळ्या शक्यता आणि जर, तरच्या गणितांची मांडणी आता केली जाऊ लागली आहे. यामध्ये एका भाजप नेत्याने येत्या ९० दिवसांत पश्चिम बंगालमधील सरकार पडेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता पश्चिम बंगालकडं लागल्या आहेत.

तृणमूलचे नेते भाजपच्या संपर्कात

लोकसभा निवडणुकांचा परिणाम देशात वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांवर दिसणार आहे. यात कर्नाटक, मध्य प्रदेशसह पश्चिम बंगालचा समावेश आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने ४२ पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला बंगालमध्ये पहिल्यांदाच एवढे यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. त्यात १४ जागांची वाढ झाल्यानं भाजपचं बळ पश्चिम बंगालमध्ये वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये बैककपूर लोकसभा मतदारसंघातून अर्जुन सिंह यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी टाइम्स नाऊला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक तृणमूल नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. अर्जुनसिंह यांनी तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केला आहे. अर्जुनसिंह यांच्या म्हणण्यानुसार तृणमूलचे नेते मुकूल रॉय यांच्या संपर्कात आहेत.

बंगालची हवा बदलतेय 

अर्जुनसिंह यांचा दावा महत्त्वाचा मानला जात आहे कारण, स्वतः अर्जुनसिंह तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. भाजपच्या इतर नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार येत्या तीन ते सहा महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. एवढंच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या आधीच पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात पंतप्राधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारादरम्यान केलेला दावा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी तृणमूलचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यात तथ्य असल्याचे राज्यातील नेते सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र तृणमूलची गाडी २२ जागांवर रोखण्यात भाजपला यश आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी २३ जागा जिंकण्याचा इरादा व्यक्त केला होता. मात्र, त्यांना केवळ १६ जागाच जिंकता आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 Results: पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ; भाजप ममता दीदींचं सरकार ९० दिवसांत पाडणार? Description: Lok Sabha 2019 Results: बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. भाजप नेत्याने येत्या ९० दिवसांत ममतांचे सरकार पडेल, असे सांगितले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles