Lok Sabha 2019 : पाहा डान्सर सपना चौधरी करतेय कोणाचा प्रचार?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 17:19 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : ईशान्य दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपकडून रिंगणात असलेल्या मनोज तिवारी यांच्या प्रचारासाठी हरियाणा डान्सर सपना चौधरीने रोड शो केला. पण, तिने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळले आहे.

sapna choudhary in bjp election campaign
सपना चौधरीने केला भाजपचा प्रचार 

नवी दिल्ली : निवडणूक प्रचारात गर्दी खेचण्यासाठी बॉलीवूड स्टार्सना निमंत्रित करणं काही नवीन नाही. प्रचारातील या सेलिब्रेटिंच्या गर्दीत आता हरियाणाची प्रसिद्ध डान्स सपना चौधरीही सामील झाली आहे. सपनानं दिल्लीत एक रोड शो केला आहे. या रोड शोला गर्दी खेचण्यात सपना आणि तिचे उमेदवार यशस्वी ठरल्याचं बोललं जातंय. दिल्लीतील ईशान्य दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपकडून भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी रिंगणात आहे. तिवारी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये सपान चौधरी सहभागी झाली होती. तिने रोड शो दरम्यान, नागरिकांना तिवारी यांच्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. या रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री विजय गोयल, दिल्ली भाजप अध्यक्ष आणि आमदार विजेंद्र गुप्तादेखील सहभागी झाले होते.

सपना भाजपमध्ये?

सपान चौधरी यापूर्वीही काही निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरल्याचे दिसले आहे. पण, मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये तिला पाहिल्यानंतर सपनाने भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळेच शो संपल्यानंतर तिला पत्रकारांनी गाठले आणि याबाबत विचारणा केली. ती म्हणाले, ‘मी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. भाजपमध्येही केलेला नाही. मनोज तिवारी हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रचारासाठी मी रोड शोमध्ये सहभागी झाले. याचा अर्थ मी भाजपमध्ये प्रवेश केला असा लावला जाऊ नये.’ सपना चौधरीला यापूर्वी अनेकवेळा मनोज तिवारी सोबत पहायला मिळाले आहे. त्यावेळीच तिच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.

काँग्रेसची झाली पंचाईत

यापूर्वी सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू होती. त्याला उत्तर प्रदेश काँग्रेसने दुजोरा दिला होता आणि सपनाच्या पक्ष प्रवेशाची माहिती दिली होती. पण, सपनाने ते वृत्त फेटाळून लावले होते. त्याला पुन्हा काँग्रेसने प्रत्युत्तर दिले होते. पक्ष प्रवेशावेळचे काही फोटो आणि फॉर्म व्हायरल केला होता. त्यानंतर सपनाने यावर खुलासा करून पक्ष प्रवेशाचे फोटो खोटो असल्याचे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसची अडचण झाली होती.

कोण आहे सपना चौधरी?

उत्तर भारतात लग्न समारंभामध्ये नाच गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाच कार्यक्रमांमधून आपल्या नृत्याने सपना चौधरीने अनेकांना घायाळ केले आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. सध्या सपना डान्सच्या एका कार्यक्रमासाठी काही लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे. कार्यक्रमांमध्ये डान्स करून ती एक सेलिब्रिटी झाली आहे. त्यामुळेच बिग बॉसच्या सिझन ११मध्ये ती सहभागी झाली होती. सपनानं अभिनयातही आपलं नशीब आजमावलं आहे. पण, त्यात तिला फारसं यश मिळालं नाही.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : पाहा डान्सर सपना चौधरी करतेय कोणाचा प्रचार? Description: Lok Sabha 2019 : ईशान्य दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपकडून रिंगणात असलेल्या मनोज तिवारी यांच्या प्रचारासाठी हरियाणा डान्सर सपना चौधरीने रोड शो केला. पण, तिने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळले आहे.
Loading...
Loading...
Loading...