Lok Sabha 2019 : मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं आवतान : पवार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 08:45 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019 : अहमदनगरमध्ये आज शरद पवार यांनी आपल्या भाषणात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडाच्या घरचं आवतान, अशी टीका पवार यांनी केली आहे.

modi government making fool people of the country says sharad pawar
मोदी सरकारने केवळ जनतेची दीशाभूल केली : पवार   |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा मोदी विरुद्ध इतर पक्ष अशी लढाई दिसत आहे. पण, महाराष्ट्रात मात्र लोकसभेची लढाई मोदी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अशीच सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पहिल्या सभेपासून शरद पवार यांना टार्गेट करण्यात सुरुवात केली. त्याला शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

नगरमध्येही शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. असं म्हटलं जातं की लबाडाच्या घरचं आवतान कधी स्वीकारू नये असं म्हणतात. पण, मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं आवतान आहे, अशा शब्दांत पवार यांनी मोदींचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेनं पाच वर्षे एक हाती सत्ता दिली असे सांगून पवार यांनी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवणारे प्रश्न उपस्थित केले. पवार म्हणाले, ‘मोदी सरकारने शेतीसाठी काय केले? वाढती बेरीजगारी रोखण्यासाठी काय केले?, देशातील अडचणीत असलेल्या कारखानदारांसाठी काय केले?’ यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादमधील सभेतही पवार यांनी याच शब्दात पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला होता.

मोदी सरकार म्हणते आम्ही सर्वांना वीज दिली. महिलांसाठी घराघरांत स्वयंपाकाचा गॅस दिला. पण, मोदी सरकारने यूपीए सरकारच्याच योजनांची नावे बदलून नवीन योजना आणल्याचे दाखवले, असा आरोप पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केवळ जनतेची दिशाभूल केली आहे. जनतेला मोदींचे सरकार खोट आश्वासने देत आहे. मोदी सरकार हे लबाड्याच्या घरचं आवतान आहे आणि आम्हांला हे आवतान स्वीकारायचा नाही. आता आम्हाला त्यांचा पराभव करायचा आहे. आता मोदी सरकारच्या पराभव कसा होईल? तर, तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला मतदान करूनच होईल.’

नगरची लढत पवार विरुद्ध विखे-पाटील

अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात बराच खल झाला. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड आग्रही होते. पण, राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडण्यास नकार दिला. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि रिंगणात उतरले. आता राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लढत जगताप विरुद्ध विखे-पाटील असले तरी ती पवार विरुद्ध विखे-पाटील अशीच असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही घराण्यांना त्यांचे अस्तीत्व पणाला लावले आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं आवतान : पवार Description: Lok Sabha 2019 : अहमदनगरमध्ये आज शरद पवार यांनी आपल्या भाषणात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदी सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडाच्या घरचं आवतान, अशी टीका पवार यांनी केली आहे.
Loading...
Loading...
Loading...