Times Now Exclusive: पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत रात्री ९ वाजता

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 19:30 IST | Times Now

Times Now Exclusive: लोकसभा निवडणुकीत ज्या मुलाखतीची उत्सुकता लागलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत आज Times Now वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे. रात्री नऊ वाजता ही मुलाखत प्रासारित होणार आहे.

PM Narendra Modi Exclusive interview
पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत रात्री ९ वाजता   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत Times Nowवर
  • रात्री नऊ वाजता Exclusive मुलाखतीचे प्रसारण
  • आरोप आणि मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका ऐका

नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वांत उत्सुकता असलेली मुलाखत आज, तमाम भारतीयांना पहायला मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ चॅनेलला एक्सक्लुझीव्ह मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी निवडणुकोत्तर आघाड्यांपासून राफेल डीलच्या आरोपापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. टाइम्स नाऊचे एडिटर एन चिफ राहुल शिवशंकर आणि मॅनेजिंग एडिटर नविता कुमार यांनी ही विशेष मुलाखत घेतली असून, रात्री नऊ वाजता ही मुलाखत टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञाला उमेदवारी देणे, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे, वादग्रस्त राफेल डिलवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पुढे असलेली आव्हाने यावर अतिशय खुलेपणाने भाष्य केले आहे. त्यामुळे ही मुलाखत कोणत्याही परिस्थितीत चुकवू नये, अशीच झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप सध्या अनेकांकडून होत आहे. पण, त्यानंतरही तुम्ही भाजपलाच मतदान का करावे? याचे उत्तरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे दिले आहे.

पंतप्रधान मोदींना आव्हान कोणाचे?

मुलाखतीमध्ये ‘राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आणि चंद्रबाबू नायडू यांचे आव्हान तुम्हाला कसे वाटते?’ या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर धक्कादायक आहे. त्याचबरोबर ‘मोदी मॅजिक’वर अजूनही तुमचा विश्वास आहे का? याचे उत्तरही पंतप्रधान मोदींनी खूप रंजक दिले आहे. निवडणूक निकालानंतर जर, भाजपला सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जागा कमी पडल्या तर, चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी यांच्याशी हातमिळवणी करणारा का?, असा प्रश्नही मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली मते स्पष्ट केली आहेत. भाजप आणि पीडीपी यांनी एकत्र येत जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावरून भाजपला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यावरही पंतप्रधान मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमित शहा यांनी ‘कोणत्याही घुसखोराला भारतात राहू देणार नाही,’ असे आश्वासन दिले आहे. त्यामागचा उद्देशही पंतप्रधान मोदींनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केला आहे.

साध्वीप्रज्ञाच्या उमेदवारीवर मोदी काय म्हणातात?

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वीप्रज्ञा सिंह ठाकूर हिला भाजपने भोपाळमधून लोकसभेचे तिकिट दिले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षाच्या या निर्णयाची पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे. राफेल डील हा गेल्या काही महिन्यांमधील सर्वांत गाजलेला मुद्दा होता. त्यावर याचिकाकर्त्यांनी  सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे, या डील संदर्भातील दस्तऐवजांची सध्याची स्थिती या गोष्टी मांडल्या आहेत. तुमचे सरकार या मुद्द्यावरून पिछाडीवर गेले आहे का? कोर्टापासून तुम्हाला काही बाबी लपवायच्या आहेत का? असे प्रश्न पंतप्रधान मोदी यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आले आहेत. ऑगस्टा वेस्टलँड, विजय मल्या, नीरव मोदी यांच्या विषयी काय म्हणाले पंतप्रधान मोदी? जाणून घेण्यासाठी रात्री नऊ वाजता टाइम्स नाऊ न्यूज चॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्सक्लुझीव्ह मुलाखत नक्की पाहा.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Times Now Exclusive: पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत रात्री ९ वाजता Description: Times Now Exclusive: लोकसभा निवडणुकीत ज्या मुलाखतीची उत्सुकता लागलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत आज Times Now वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे. रात्री नऊ वाजता ही मुलाखत प्रासारित होणार आहे.
Loading...
Loading...
Loading...