दिग्विजय सिंहनी विचारले- खात्यात १५ लाख आले का? तरूणाच्या उत्तराने झाले सारे हैराण

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 20:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

दिग्विजय सिंहने एका सभेदरम्यान विचारले की तुमच्या खात्यात १५ लाख रूपये जमा झाले का?तेव्हा एका तरुणाने मंचावर येत मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांना मारले.

digvijay singh
दिग्विजय सिंह  |  फोटो सौजन्य: ANI

भोपाळ: काँग्रेस नेता आणि भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान हैराण करणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका प्रचारसभेदरम्यान दिग्विजय सिंह पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी सभेमध्ये एक प्रश्न विचारला की १५ लाख रूपये तुमच्या खात्यात जमा झाले का? यावेळी एका तरूणाने उत्तर दिले की, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांना ठार केले. लोकांना संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले, कोणाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा झाले आहेत. तेव्हा एका तरुणाने उत्तर हा म्हणून दिले. यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्याला मंचावर बोलावले आणि माईकवर बोलण्यास सांगितले. त्यावर तो तरूण म्हणाला, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांना ठार केले. 

या घटनेनंतर एक व्यक्ती त्या तरूणाला खेचत घेऊन जाते आणि मंचावरून खाली उतरवते. यानंतर दिग्विजय सिंह यावर म्हणतात, तुझ्या खात्यात १५ लाख आले की नाही. सर्जिकल स्ट्राईक केला. तुला काय रोजगार मिळाला? तुझ्या खात्यात १५ लाख आले आणि नोकरीही मिळाली का?

१५ लाख रूपयांच्या मुद्द्यावरून विरोधक अनेकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान, १५ लाखाच्या मुद्द्यांवरून विरोधकांवरच डाव उलटल्याची ही पहिलीच वेळ आहे. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरशी मुकाबला

यंदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह यांचा मुकाबला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध होत आहे. भाजपने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे यंदाची भोपाळची निवडणूक चुरशीची होणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह या मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी होत्या. दरम्यान, कोर्टातील केस दरम्यान न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे त्या भाजपच्या तिकीटावर भोपाळमधून निवडणूक लढवत आहेत.  

 

 

 

साध्वी प्रज्ञा सिंहचे वादग्रस्त विधान

दरम्यान, निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दिग्विजय सिंह यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. हेमंत करंकरेना मी शाप दिला होता. मी दिलेल्या शापामुळेच त्यांच्याबाबत असे घडले असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. दरम्यान त्यांना या विधानामुळे चांगलीच टीका सहन करावी लागली. 

सहाव्या टप्प्यात मतदान

भोपाळमध्ये लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पार झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला होत आहे. त्यानंतर २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मेला हे मतदान पार पडणार आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिग्विजय सिंहनी विचारले- खात्यात १५ लाख आले का? तरूणाच्या उत्तराने झाले सारे हैराण Description: दिग्विजय सिंहने एका सभेदरम्यान विचारले की तुमच्या खात्यात १५ लाख रूपये जमा झाले का?तेव्हा एका तरुणाने मंचावर येत मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांना मारले.
Loading...
Loading...
Loading...