टाईम्स नाऊ-ओरआरजी एक्झिट पोल २०१४ - सर्वेक्षणात म्हटले होते एनडीला मिळणार बहुमत, यूपीएला धक्का

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 15:47 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टाईम्स नाऊ-ओआरजी एक्झिट पोल २०१४: टाईम्स नाऊ-ओआरजीच्या सर्व्हेमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असे सांगण्यात आले होती. ही बाब खरी ठरली. यूपीए आणि अन्य पक्षांबाबत करण्यात आलेले अनुमानही निकालाच्या जवळपास जाणार

exit poll 2014
एक्झिट पोल २०१४ 

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९च्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. देशातील सात राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. यासोबतच आज मतदानाची प्रक्रिया संपणार आहे. २०१९मध्ये कोणाचे सरकार येणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या विजयाचा दावा करत आहेत. लोकही आपल्या हिशोबाने पक्षांना विजयी तसेच पराभूत ठरवत आहेत. या सगळ्यांमध्ये आज संध्याकाळी येणाऱ्या टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोलवर साऱ्यांची नजर टिकली आहे. एक्झिट पोलमध्ये पुढे कोणाचे सरकार असणार आहे याचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकते. येथे आपण २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत चर्चा करूया. 

गेल्या वेळेस सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुतम मिळणार असल्याचे म्हटले होते. ही गोष्ट खरीही ठरली. देशातील जनता पुढील सत्तेची चावी कोणाच्या हाती सोपवणार यांचा काहीसा अंदाज एक्झिट पोलद्वारे मिळतो. 

२०१४च्या एक्झिट पोलबाबत बोलायचे झाल्यास सर्वांनीच केलेल्या सर्व्हेमध्ये एनडीएला बहुमत मिळेल असा दावा केला होता. काहींनी भाजपला २०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला तर काहींनी हा आकडा ३००पर्यंत जाईल असे म्हटले होते. या सर्व्हेवरून हे स्पष्ट होते की काँग्रेस सत्तेबाहेर जाणार. दरम्यान एआयडीएमके आणि तृणमूल काँग्रेसला २०हून अधिक जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. 

  1. टाईम्स नाऊ-ओआरजीच्या सर्वेक्षणात एनडीएला २५७, यूपीएला १३५ आणि इतरांना १५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर सीएनएन-आयबीएन-सीएसडीएसने भाजपला २३६ जागा तर एनडीएला बहुमत दाखवताना २७६ जागा मिळणार असल्याचा अंदाज केला होता. या सर्वेक्षणाात काँग्रेसला ७७ आणि यूपीएला ९७ जागांवर यश मिळेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती तर इतरांना १७० जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. 
  2. हेडलाईन्स टुडे सिसरोच्या सर्वेक्षणात  एनडीला पूर्ण बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार एनडीएला २७२ तर यूपीएला ९७ जागांवर यश मिळेल असे सांगण्यात आले होते. तर इतरांना १५६ जागा मिळतील असा अंदाज होता. एबीपी न्यूज-नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला २८१ आणि यूपीएला ९७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 
  3. न्यूज २४ टुडे चाणक्यच्या सर्वेक्षणानुसार भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे सांगितले होते. या सर्वेक्षणात भाजप २९१ आणि एनडीए ३४० जागांसह पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल. हा सर्वे योग्य ठरला. सर्वेमध्ये काँग्रेसला ५७, यूपीएला ७० आणि इतरांना १३० जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. हे सर्वेक्षण वास्तवतेच्या जवळ जाणारे ठरले. सी व्होटर्स-इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणाबाबत बोलायचे झाल्यास भाजपला २४९, एनडीएला २८९, काँग्रेसला ७८, यूपीएला १०१ आणि इतरांना १५३ जागांवर यश मिळेल असे सांगण्यात आले होते. 
  4. इतर पक्षांबाबत बोलायचे झाल्यास टाईम्स नाऊ-ओआरजीच्या सर्वेक्षणात बिहारमध्ये आरजेडीला ०, जनता दल(युनायटेड)ला १० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हेडलाईन्स टुडे सिसरोने कर्नाटकमध्ये काँग्रेसला २८पैकी १५-१९ जागा मिळणार असल्याचा दावा केला होता तर न्यूज २४च्या सर्वेक्षणात भाजपला २०हून अधिक जागांवर यश मिळेल असे म्हटले होते. 
  5. हेडलाईन्स टुडे आणि न्यूज २४च्या सर्वेक्षणानुसार राजस्थानच्या २५ जागांवर काँग्रेसला साफ अपयश मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते तर टाईम्स नाऊच्या मते भाजपला १४ जागांवर विजय मिळू शकतो असे म्हटले होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष दमदार कामगिरी करेल असे सगळ्याच सर्वेक्षणात म्हटले होते मात्र न्यूज २४ टुडे चाणक्यने सर्वेक्षणात म्हटले होते की आप १३पैकी ५ जागांवर विजय मिळवू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
टाईम्स नाऊ-ओरआरजी एक्झिट पोल २०१४ - सर्वेक्षणात म्हटले होते एनडीला मिळणार बहुमत, यूपीएला धक्का Description: टाईम्स नाऊ-ओआरजी एक्झिट पोल २०१४: टाईम्स नाऊ-ओआरजीच्या सर्व्हेमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असे सांगण्यात आले होती. ही बाब खरी ठरली. यूपीए आणि अन्य पक्षांबाबत करण्यात आलेले अनुमानही निकालाच्या जवळपास जाणार
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles