लोकसभा निवडणूक २०१९: सातव्या टप्प्यात उत्साहात मतदान

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 17:28 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

लोकसभा निवडणूक २०१९च्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. ८ राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगडमध्ये मतदान होत आहे.

lok sabha election 2019
लोकसभा निवडणूक २०१९  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई:  लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज ८ राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. अखेरच्या टप्प्यात पंजाबमध्ये १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगालमध्ये ९, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये ८, हिमाचल प्रदेशमध्ये ४, झारखंडमध्ये ३ आणि चंदीगडमध्ये एका जागेवर मतदान होत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्येही मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण ६ सेलिब्रेटी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात एकूण सात टप्प्यांत मतदान होत असून या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे.

सातव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०३ टक्के मतदान

 1. बिहार - ४६.७५ टक्के मतदान
 2. हिमाचल प्रदेश - ५७.४३ टक्के मतदान
 3. झारखंड -६६.६४ टक्के मतदान
 4. मध्यप्रदेश - ५९.७५ टक्के मतदान
 5. पंजाब - ५०.४९ टक्के मतदान
 6. उत्तरप्रदेश - ४७.२१ टक्के मतदान
 7. पश्चिम बंगाल - ६४.८७ टक्के मतदान
 8. चंडीगढ - ५१.१८ टक्के मतदान

 

 

दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ४८.१२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ४८.१२ टक्के मतदान झाले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे

 1. बिहार- ४३.४३ %, 
 2. हिमाचल प्रदेश- ४६.७६ %, 
 3. मध्य प्रदेश- ५१.८८%,
 4. पंजाब- ४५.१३ %, 
 5. उत्तर प्रदेश- ४४.५३ %,
 6. पश्चिम बंगाल- ५५.९६ %,
 7. झारखंड- ६०.९६ %,
 8. चंदीगड- ३७.५० % 

दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ४१.३० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४१.३० टक्के मतदान झाले आहे. विविध राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

 1. बिहार-३६.२० %, 
 2. हिमाचल प्रदेश- ४२.४० %, 
 3. मध्य प्रदेश- ४५.८१.२९ %,
 4.  पंजाब- ३७.८८ %, 
 5. उत्तर प्रदेश- ३७.०० %,
 6. पश्चिम बंगाल- ४९.७९ %,
 7. झारखंड- ५२.८९%,
 8.  चंदीगड- ३७.५०% 

बिहार - शत्रुघ्न सिन्हा यांचे पाटणामध्ये मतदान

 

 

पटना साहिब येथून काँग्रेसचे उमेदवार असलेला शत्रुघ्न सिन्हा यांनी पटनाच्या सेंट सेव्हरिन स्कूल, कदम कुआंमध्ये मतदान केले. या जागेवरुन त्यांच्याविरोधात भाजपचे रविशंकर प्रसाद आहेत. 

तेजप्रताप यादव यांच्या समर्थकांनी केली कॅमेरामनला मारहाण

 

 

तेजप्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी पाटणा येथे एका कॅमेरा पर्सनला मारहाण केली. कॅमेरा पर्सनवर यादव यांच्या कारची विंडस्क्रीन तोडल्याचा आरोप आहे. जेव्हा तेज प्रताप मतदानाला जात असताना हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सिंद्धू यांनी पत्नीसह केले मतदान

 

 

पंजाब सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीसह अमृतसर येथील बूथ क्रमांक १३४मध्ये मतदान केले. पंजाबच्या १३ही जागांवर आज मतदान होत आहे. 

११ वाजेपर्यंत एकूण १६.९७ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले आहे. विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे

 1. बिहार-१७.९४%, 
 2. हिमाचल प्रदेश- १५.६६%, 
 3. मध्य प्रदेश-१६.२८%,
 4. पंजाब- १५.७०%, 
 5. उत्तर प्रदेश- १४.४३%,
 6. पश्चिम बंगाल- २१.११%,
 7. झारखंड- २३.८६%,
 8.  चंदीगड- २२.३०% 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदोरमध्ये केले मतदान

 

 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदोरमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मध्य प्रदेशाच्या आठ लोकसभा मतदार संघात देवास, उज्जैन, इंदोर, मंदसौर, रतलाम, धार, खरगोन आणि खंडवा येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 

हरभजन सिंगचे मतदान

 

 

भारताचा क्रिकेटर हरभजन सिंग मतदानासाठी जालंधरमधील गढी गावात पोहोचला. यावेळी त्याने रांगेत उभे राहत मतदानाला पसंती दिली. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३ लोकसभेच्या जागांवर मतदान होत आहे. येथे दोन केंद्रीय मंत्र्यांसह २७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले मतदान

 

 

 

बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी पटनामध्ये राजभवन शाळेच्या बूथ क्रमांक ३२६वर जाऊन मतदान केले. अंतिम टप्प्या बिहारमध्ये ९ जागांसाठी मतदान होत आहे. 

पंतप्रधानांनी ट्विट करत केले मतदानाचे आवाहन

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यात मतदारांनी रेकॉर्डब्रेक संख्येने मतदान करावे. तुमचे एक मत येणाऱ्या वर्षांमध्ये भारतात विकासाल नवा आकार मिळणार आहे. मला आशा आहे की पहिले मतदान उत्साहाने मतदान करतील. 

लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत १०.४० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विविध राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशामध्ये मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे

 1. बिहार-१०.६५%, 
 2. हिमाचल प्रदेश- ३.०१%, 
 3. मध्य प्रदेश-११.८५%,
 4.  पंजाब- ९.६९%, 
 5. उत्तर प्रदेश- ८.२९%,
 6. पश्चिम बंगाल- १४.२२%,
 7. झारखंड-१५.००%,
 8.  चंदीगड- १०.४०% 

आज अखेरच्या टप्प्यातील मतदान सहा वाजता पूर्ण होणार असून येत्या २३ मेला मतमोजणी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लोकसभा निवडणूक २०१९: सातव्या टप्प्यात उत्साहात मतदान Description: लोकसभा निवडणूक २०१९च्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. ८ राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगडमध्ये मतदान होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles