मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज भांडुप येथे सभा घेतली. राज ठाकरेंनी यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात प्रचाराचा चंग बांधला आहे. राज्यभरात ते विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात प्रचारसभा घेत आहेत. आपल्या आतापर्यंतच्या सभांमधून राज ठाकरेंनी विविध मुद्दे तसेच विषयांवरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदींनी आतापर्यंत दिलेली आश्वासने तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेली वचने पाळली नसल्याचा आरोप राज ठाकरे करत आहेत. त्यामुळे लोकांनी भाजपला मतदान करू नये असे आवाहन ते या प्रचारसभेद्वारे लोकांना करत आहेत. दुसऱ्या टप्यातील राज ठाकरेंच्या पुढील सभा पनवेल आणि नाशिक येथे होत आहेत. राज ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे तसे मान्य केले नसले तरीही या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला आपसूकच होत आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा...
दुसऱ्या टप्प्यातील राज ठाकरेंच्या सभा नाशिक आणि पनवेलला होणार आहेत. या सभांमध्येही राज ठाकरे भाजप सरकारचे वाभाडे काढणार आहे.