लोकसभा निवडणूक निकाल: सर्व निकाल एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha Election Result: देशभरात एकूण सात टप्प्यांत सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. त्यानंतर आता या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे अपडेट्स...

lok sabha election results 2019 live updates
लोकसभा निवडणूक निकाल LIVE 

नवी दिल्ली: देशभरात एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत देशभरात मतदान पार पडलं. या निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर झाले आहेत. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता निकाल समोर आले आहेत. पाहा कुठल्या मतदारसंघात कुणाचा विजय झाला आहे.

यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला होता. ईव्हीएममधील मतमोजणी सोबतच विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील पावत्यांची मोजणी करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणूक निकालांचे UPDATES:

 1.      पंजाब - गुरुदासपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार सनी देओल 82,459 मतांनी विजयी 
 2.      जळगाव - भाजपचे उन्मेश पाटील 411617 मतांनी विजयी
 3.      धुळे - भाजपचे सुभाष भामरे 229243 मतांनी विजयी
 4.      कल्याण लोकसभा निवडणूक २०१९: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे 3,63,456 मतांनी आघाडीवर
 5.      रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे 335882 मतांनी विजयी
 6.      उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर 127566 मतांनी विजयी
 7.      रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेनेचे विनायक राऊत 178322 मतांनी विजयी
 8.      परभणी लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेचे संजय जाधव यांचा 42,199 मतांनी विजय
 9.      सचिन तेंडुलकरने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन 
 10.      आपण संकल्प केला तर सर्वकाही शक्य आहे - मोदी
 11.      ही निवडणूक अशी होती ज्यात एकाही विरोधी पक्षाने महागाईचा मुद्दा मांडला नाही, मात्र, यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार आणि महागाई हे मुद्दे होतेच - मोदी
 12.      हा विजय प्रत्येक आईचा आहे - मोदी
 13.      हा मोदींचा विजय नाही, तर देशातील प्रामाणिक नागरिकांचा आणि तरुणांचा विजय आहे - मोदी
 14.      लोकसभा निवडणुकांसोबतच ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले - मोदी
 15.      सर्वच पक्षातील विजयी उमेदवार येत्या काळात देशाची सेवा करतीस असा विश्वास आहे - मोदी
 16.      सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन - मोदी
 17.      हा विजय जनतेच्या चरणी समर्पित करतो - मोदी 
 18.      आज जनतेचा विजय झाला आहे - मोदी
 19.      आज लोकशाहीचा विजय झाला आहे - मोदी
 20.      सर्वच मतदारांचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार - मोदी
 21.      देशवासियांना अभिवादन करतो - मोदी 
 22.      आज मेघराज सुद्धा या विजयोत्सवात सहभागी झाले आहेत - मोदी 
 23.      पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत 
 24.      मला निवडून दिल्याबद्दल गांधीनगरच्या मतदारांचे आभार - अमित शहा
 25.      पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपने १८ जागा जिंकल्या, येत्या काळात भाजपचं वर्चस्व संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये असेल - अमित शहा
 26.      केवळ लोकसभा निवडणुकांमध्येच नाही तर विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपच्या सहयोगी पक्षांना चांगलं यश मिळालं - अमित शहा
 27.      उत्तरप्रदेशात सपा-बसपाचा पराभव करुन भाजपने प्रचंड मतांनी विजय मिळवला - अमित शहा
 28.      १७ राज्यांत काँग्रेस पक्षाने खातं सुद्धा उघडता आलं नाही - अमित शहा
 29.      ५० वर्षांत पहिल्यांदाच काम करणारा एक पंतप्रधान दुसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान बनणार आहे - अमित शहा 
 30.      हा एक ऐतिहासिक विजय आहे - अमित शहा 
 31.      भाजप मुख्यालयात अमित शहांचं भाषण 
 32.      भाजप मुख्यालयात राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा उपस्थित 
 33.      पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल 
 34.      गोरखपूर मतदारसंघातून भाजपचे रवी किशन ३,०१,६६४ मतांनी विजयी 
 35.      निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर हँडलवरुन 'चौकीदार' शब्द हटवला
 36.      निकालानंतर नरेंद्र मोदींनी ट्विटरवरील 'चौकीदार' शब्द हटवला
 37.      मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे आणि नरेंद्र मोदींचं अभिनंदन - प्रियंका गांधी 
 38.      निकालापूर्वीच राहुल गांधींनी मान्य केला पराभव 
 39.      अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी विजयी झाल्याचं म्हणत केलं अभिनंदन
 40.      गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा १,३६,००० मतांनी पराभव
 41.      पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं अभिनंदन 
 42.      बिहारमध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन 
 43.      कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष 
 44.      काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून ८,३८,३७१ मतांनी आघाडीवर 
 45.      दुबईत भाजप समर्थकांचं सेलिब्रेशन सुरु 
 46.      गोपाळ शेट्टींचं अभिनंदन - उर्मिला मातोंडकर 
 47.      पराभव झाला तरी राजकारण सोडणार नाही - उर्मिला मातोंडकर
 48.      उर्मिला मातोंडकरने मानले मतदारांचे आभार
 49.      भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं अभिनंदन 
 50.      वायनाड मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ७,९०,००० मतांनी आघाडीवर 
 51.      वाराणसी मतदारसंघातून मोदींचा ३ लाख ८५ हजार मतांनी विजय
 52.      नांदेड - भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा विजय 
 53.      नांदेड - अशोक चव्हाण ५० हजार मतांनी पराभूत
 54.      दिल्लीत भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, सेलिब्रेशनला सुरुवात 
 55.      पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं "सबका साथ सबका विकास सबका विश्वास - विजयी भारत" 
 56.      रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन 
 57.      भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलं अभिनंदन 
 58.      गांधीनगर मतदारसंघातून भाजप अध्यक्ष अमित शहा ५ लाखांहून अधिक मतांनी विजयी
 59.      अमेठीत स्मृती इराणी ११२२६ मतांनी आघाडीवर 
 60.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी १२०२० मतांनी आघाडीवर
 61.      उत्तरप्रदेशात सपा-बसपाला मोठा झटका, भाजपच्या उमेदवारांची मोठी आघाडी
 62.      लखनऊमध्ये राजनाथ सिंह यांना आघाडी
 63.      वाराणसीत नरेंद्र मोदींना २,२२,८५७ मतांची आघाडी
 64.      बागपत मतदारसंघात भाजपचे सत्यपाल सिंग २४,००० मतांनी आघाडीवर
 65.      मुझफ्फरनगर मतदारसंघात अजित सिंग २२३८३ मतांनी आघाडीवर
 66.      अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी ३५०० मतांनी आघाडीवर     
 67.      जयपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष 
 68.      दिल्लीतील सर्व सात जागांवर भाजप आघाडीवर   
 69.      वाराणसीत नरेंद्र मोदी १,७१,४७९ मतांनी आघाडीवर
 70.      अखिलेश यादव ५२००९ मतांनी आघाडीवर
 71.      ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर
 72.      पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
 73.      महाराष्ट्रातील औरंगााबाद मतदारसंघात - इम्तियाज जलील ११,४११ मतांनी आघाडीवर 
 74.     मध्यप्रदेशातील सेहूर येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा मृत्यू
 75.      एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी ८५,००० मतांनी आघाडीवर
 76.       
 77.      सोलापुरात सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर
 78.      अभिनेत्री हेमा मालिनी ६६३०३ मतांनी आघाडीवर
 79.      केरळमध्ये २० जागांपैकी यूडीएफ १९ जागांवर आघाडी, एलडीएफला अवघ्या एका जागेवर आघाडी  
 80.      ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे संबित पात्रा ७०० मतांनी आघाडीवर
 81.      एनडीए ३३२, यूपीए १०६ जागांवर आघाडीवर
 82.      लखनऊ मतदारसंघातून भाजपचे राजनाथ सिंग ६१,००० मतांनी आघाडीवर
 83.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी ७,६०० मतांनी आघाडीवर
 84.      पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना झटका, भाजप १७ जागांवर आघाडीवर
 85.      एनडीए ३३०, काँग्रेस ९९ जागांवर आघाडीवर
 86.      वायनाडमध्ये राहुल गांधी ४३,३८२ मतांनी आघाडीवर
 87.      भाजपला २९५ जागांवर तर काँग्रेसला ५१ जागांवर आघाडी
 88.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती ईराणी ४३०० मतांनी आघाडीवर
 89.      अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं अभिनंदन 
 90.      अमेठीतून भाजपच्या स्मृती ईराणी २५०१ मतांनी आघाडीवर
 91.      कर्नाटकातील २८ जागांपैकी भाजप २४ जागांवर, काँग्रेस २ जाागंवर विजयी   
 92.      गांधीनगर मतदारसंघात भाजप अध्यक्ष अमित शहा १,२५,००० मतांनी आघाडीवर 
 93.      
 94.      महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजप २३, शिवसेना २०, राष्ट्रवादी ४, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
 95.      मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४० हजारांच्यापुढे तर निफ्टी १२,०००वर
 96.      भाजप २७९ जागांवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर
 97.      भाजप २७७ जागांवर आघाडीवर
 98.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी ५,६०० मतांनी आघाडीवर तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर
 99.      दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघात भाजपचे हर्षवर्धन आघाडीवर
 100.      उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजपचे मनोज तिवारी ४,६७८ मतांनी आघाडीवर
 101.      पिलभीत मतदार संघातून भाजपचे वरुण गांधी २७,००० मतांनी आघाडीवर
 102.      वायनाड मतदारसंघात राहुल गांधी १०,००० मतांनी आघाडीवर
 103.      अरुणाचल प्रदेशात भाजप ७ जागांवर आघाडीवर 
 104.      दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर भाजप आघाडीवर
 105.      वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी २०,००० मतांनी आघाडीवर 
 106.      आंध्रप्रदेशात वायएसआरसीपी ३५ जागांवर आघाडीवर तर तेलुगू देसम पार्टी ६ जागांवर आघाडीवर      
 107.      पाटणा लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर तर रवी शंकर प्रसाद आघाडीवर
 108.    
 109.      गुरुदासपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार सनी देओल आघाडीवर
 110.      तमिळनाडूत डीएमके ३४ जागांवर तर एआयएडीएमके ३ जागांवर आघाडीवर
 111.      आसनसोल मतदारसंघात भाजप उमेदवार बाबुल सुप्रियो आघाडीवर
 112.      एनडीए १८९ तर यूपीए १०६ जागांवर आघाडीवर 
 113.      भाजप १६२ जागांवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर
 114.      मुंबईत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी १५,२०० मतांनी आघाडीवर 
 115.      महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर उदयनराजे भोसले पिछाडीवर
 116.      वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर 
 117.      भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर
 118.      भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर
 119.      आतापर्यंत सुजय विखे यांना २९,६०० मतं तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना १७,३४८ मतं
 120.      राज्यात अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे आघाडीवर
 121.      महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे १८०० मतांनी आघाडीवर
 122.      मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजप उमेदवार आघाडीवर
 123.      अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर
 124.      महाराष्ट्रातील कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
 125.      भाजप ११० जागांवर तर काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर
 126.      वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर
 127.      अमित शहा आघाडीवर
 128.      सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
 129.      रत्नागिरी- सिंधुदुर्गात शिवसेना उमेदवार विनायक राऊत आघाडीवर
 130.      औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
 131.      नागपुरात काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप
 132.      देशभरात भाजप ६७ जागांवर काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर
 133.      महाराष्ट्रात भाजप ७, शिवसेना ४ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
 134.      महाराष्ट्रात शिवसेना ४, भाजप ७ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
 135.      ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आघाडीवर
 136.      उत्तरप्रदेशात भाजप २ तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
 137.      देशभरातील ११ जागांवर भाजप आघाडीवर तर दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर
 138.      राजस्थानमध्ये भाजप ५ जागांवर आघाडीवर
 139.      भाजप दोन जागांवर आघाडीवर
 140.      टपाल मतपत्रिकांची मोजणी
 141.      देशभरात मतमोजणीला सुरुवात
 142.      मतदारांच्या आकड्यानुसार आंध्रप्रदेशातील मलकाजगिरी हा देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे ३१,८३,३२५ मतदार होते. 
 143.      देशभरात १०.३५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. 
 144.      देशभरातील एकूण ८,०४० उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज ठरणार
 145.      देशभरातील विविध पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला 
 146.      देशभरातील एकूण ५४३ जागांपैकी ५४२ लोकसभा मतदारसंघांत होणार मतमोजणी, वेल्लूर (तमिळनाडू) या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आल्याने ५४२ जागांसाठीच झालं होतं मतदान
 147.      थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
 148.      मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
 149.      काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभा उमेदवार संजय निरुपम यांनी घेतलं श्री सिद्धिविनायकाचं दर्शन
 150.      सर्वप्रथम होणार टपाल मतपत्रिकांची मोजणी
 151.      सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात 

 

देशभरात सात टप्प्यांत मतदान 

 1. पहिला टप्पा - ९१ जागांसाठी मतदान 
 2. दुसरा टप्पा - ९७ जागांसाठी मतदान 
 3. तिसरा टप्पा - ११५ जागांसाठी मतदान 
 4. चौथा टप्पा - ७१ जागांसाठी मतदान 
 5. पाचवा टप्पा - ५१ जागांसाठी मतदान
 6. सहावा टप्पा - ५९ जागांसाठी मतदान 
 7. सातवा टप्पा - ५९ जागांसाठी मतदान 

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान 

 1. ११ एप्रिल २०१९ - पहिला टप्पा - ७ जागांसाठी मतदान 
 2. १८ एप्रिल २०१९ - दुसरा टप्पा - १० जागांसाठी मतदान
 3. २३ एप्रिल २०१९ - तिसरा टप्पा - १४ जागांसाठी मतदान 
 4. २९ एप्रिल २०१९ - चौथा टप्पा - १७ जागांसाठी मतदान 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लोकसभा निवडणूक निकाल: सर्व निकाल एका क्लिकवर Description: Lok Sabha Election Result: देशभरात एकूण सात टप्प्यांत सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. त्यानंतर आता या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे अपडेट्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles