लोकसभा निवडणूक निकाल LIVE: अमित शहा १,२५,००० मतांनी आघाडीवर 

Lok Sabha Election Result LIVE: देशभरात एकूण सात टप्प्यांत सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. त्यानंतर आता या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे अपडेट्स...

lok sabha election results 2019 live updates
लोकसभा निवडणूक निकाल LIVE 

नवी दिल्ली: देशभरात एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत देशभरात मतदान पार पडलं. या निवडणुकीचे निकाल आज (२३ मे) रोजी जाहीर होत आहेत. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस सिस्टमच्या माध्यमातून टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. ईव्हीएममधील मतमोजणी सोबतच विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील पावत्यांची मोजणी केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला अधिक वेळ लागेल आणि परिणामी निवडणुकीचे निकाल येण्यास उशीर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक निकालांचे LIVE UPDATES:

 1.      
 2.      एनडीए ३३०, काँग्रेस ९९ जागांवर आघाडीवर
 3.      वायनाडमध्ये राहुल गांधी ४३,३८२ मतांनी आघाडीवर
 4.      भाजपला २९५ जागांवर तर काँग्रेसला ५१ जागांवर आघाडी
 5.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती ईराणी ४३०० मतांनी आघाडीवर
 6.      अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं अभिनंदन 
 7.      अमेठीतून भाजपच्या स्मृती ईराणी २५०१ मतांनी आघाडीवर
 8.      कर्नाटकातील २८ जागांपैकी भाजप २४ जागांवर, काँग्रेस २ जाागंवर विजयी   
 9.      गांधीनगर मतदारसंघात भाजप अध्यक्ष अमित शहा १,२५,००० मतांनी आघाडीवर 
 10.      
 11.      महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजप २३, शिवसेना २०, राष्ट्रवादी ४, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
 12.      भाजप २७९ जागांवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर
 13.      भाजप २७७ जागांवर आघाडीवर
 14.      अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी ५,६०० मतांनी आघाडीवर तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर
 15.      दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघात भाजपचे हर्षवर्धन आघाडीवर
 16.      उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजपचे मनोज तिवारी ४,६७८ मतांनी आघाडीवर
 17.      पिलभीत मतदार संघातून भाजपचे वरुण गांधी २७,००० मतांनी आघाडीवर
 18.      वायनाड मतदारसंघात राहुल गांधी १०,००० मतांनी आघाडीवर
 19.      अरुणाचल प्रदेशात भाजप ७ जागांवर आघाडीवर 
 20.      दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर भाजप आघाडीवर
 21.      वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी २०,००० मतांनी आघाडीवर 
 22.      आंध्रप्रदेशात वायएसआरसीपी ३५ जागांवर आघाडीवर तर तेलुगू देसम पार्टी ६ जागांवर आघाडीवर      
 23.      पाटणा लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर तर रवी शंकर प्रसाद आघाडीवर
 24.    
 25.      गुरुदासपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार सनी देओल आघाडीवर
 26.      तमिळनाडूत डीएमके ३४ जागांवर तर एआयएडीएमके ३ जागांवर आघाडीवर
 27.      आसनसोल मतदारसंघात भाजप उमेदवार बाबुल सुप्रियो आघाडीवर
 28.      एनडीए १८९ तर यूपीए १०६ जागांवर आघाडीवर 
 29.      भाजप १६२ जागांवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर
 30.      मुंबईत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी १५,२०० मतांनी आघाडीवर 
 31.      महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर उदयनराजे भोसले पिछाडीवर
 32.      वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर 
 33.      भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर
 34.      भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर
 35.      आतापर्यंत सुजय विखे यांना २९,६०० मतं तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना १७,३४८ मतं
 36.      राज्यात अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे आघाडीवर
 37.      महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे १८०० मतांनी आघाडीवर
 38.      मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजप उमेदवार आघाडीवर
 39.      अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर
 40.      महाराष्ट्रातील कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर
 41.      भाजप ११० जागांवर तर काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर
 42.      वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर
 43.      अमित शहा आघाडीवर
 44.      सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
 45.      रत्नागिरी- सिंधुदुर्गात शिवसेना उमेदवार विनायक राऊत आघाडीवर
 46.      औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
 47.      नागपुरात काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप
 48.      देशभरात भाजप ६७ जागांवर काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर
 49.      महाराष्ट्रात भाजप ७, शिवसेना ४ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
 50.      महाराष्ट्रात शिवसेना ४, भाजप ७ आणि काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
 51.      ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आघाडीवर
 52.      उत्तरप्रदेशात भाजप २ तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
 53.      देशभरातील ११ जागांवर भाजप आघाडीवर तर दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर
 54.      राजस्थानमध्ये भाजप ५ जागांवर आघाडीवर
 55.      भाजप दोन जागांवर आघाडीवर
 56.      टपाल मतपत्रिकांची मोजणी
 57.      देशभरात मतमोजणीला सुरुवात
 58.      मतदारांच्या आकड्यानुसार आंध्रप्रदेशातील मलकाजगिरी हा देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे ३१,८३,३२५ मतदार होते. 
 59.      देशभरात १०.३५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. 
 60.      देशभरातील एकूण ८,०४० उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज ठरणार
 61.      देशभरातील विविध पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला 
 62.      देशभरातील एकूण ५४३ जागांपैकी ५४२ लोकसभा मतदारसंघांत होणार मतमोजणी, वेल्लूर (तमिळनाडू) या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आल्याने ५४२ जागांसाठीच झालं होतं मतदान
 63.      थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
 64.      मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था
 65.      काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभा उमेदवार संजय निरुपम यांनी घेतलं श्री सिद्धिविनायकाचं दर्शन
 66.      सर्वप्रथम होणार टपाल मतपत्रिकांची मोजणी
 67.      सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात 

 

देशभरात सात टप्प्यांत मतदान 

 1. पहिला टप्पा - ९१ जागांसाठी मतदान 
 2. दुसरा टप्पा - ९७ जागांसाठी मतदान 
 3. तिसरा टप्पा - ११५ जागांसाठी मतदान 
 4. चौथा टप्पा - ७१ जागांसाठी मतदान 
 5. पाचवा टप्पा - ५१ जागांसाठी मतदान
 6. सहावा टप्पा - ५९ जागांसाठी मतदान 
 7. सातवा टप्पा - ५९ जागांसाठी मतदान 

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान 

 1. ११ एप्रिल २०१९ - पहिला टप्पा - ७ जागांसाठी मतदान 
 2. १८ एप्रिल २०१९ - दुसरा टप्पा - १० जागांसाठी मतदान
 3. २३ एप्रिल २०१९ - तिसरा टप्पा - १४ जागांसाठी मतदान 
 4. २९ एप्रिल २०१९ - चौथा टप्पा - १७ जागांसाठी मतदान 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लोकसभा निवडणूक निकाल LIVE: अमित शहा १,२५,००० मतांनी आघाडीवर  Description: Lok Sabha Election Result LIVE: देशभरात एकूण सात टप्प्यांत सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. त्यानंतर आता या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे अपडेट्स...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles