Lok Sabha elections 2019 : काँग्रेस अंबानी, कोटक यांच्या जीवावर चालणारा पक्ष : तावडे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

LS elections 2019 : ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यावरून विनोद तावडे यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केलाय.

Vinod tawade
आता काँग्रेसचा खरा चेहरा कळाला : विनोद तावडे   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

मुंबई : मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या एका पाठिंब्याची जोरदार चर्चा आहे. हा पाठिंबा म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा. अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आता भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप हा मध्यमवर्गीयांचा पक्ष असून, काँग्रेस अंबानी, कोटक यांसारख्या उद्योगपतींच्या जीवावर चालणारा पक्ष असल्याचे उघड झाले आहे, असे मत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘एका बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष भाजपवर ठराविक उद्योगपतींसाठी चालवला जाणार पक्ष अशी टीका करतात. तर दुसरीकडे त्यांचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा स्वतः अंबानी आणि कोटक यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केल्याचं सांगतात. यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अंबानी, कोटक यांसारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस चालत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.’ एका बाजुला राहुल गांधींची टीका आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद देवरा यांचा दावा यातली कोणती गोष्ट खरी मानायची असा सवाल शिक्षणमंत्री तावडे यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप सामान्य, गरीब, आदीवासी, मागास, कामगार, मध्यमवर्गीयांच्या ताकदीवर चालणारा पक्ष आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

गांधी कुटुंबाचा त्याग आठवला नाही?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकार भूलथापा मारत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याग करणाऱ्या गांधी घराण्याविषयी आदर बाळगला तर त्यात चुकीचे काय?, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यावर तावडे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी भूलथापा म्हणावे म्हणजे आश्चर्यच आहे. तुम्ही आता गांदी कुटुंबाच्या त्यागाची भाषा करत आहात. दोन वेळा काँग्रेस सोडताना तुम्हाला त्याग आठवला नाही का?’

बातमीची भावकी

साध्वी प्रज्ञाला पाठिंबा

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तिच्या निवडणूक लढवण्यात गैर काहीच नाही, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. मुळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावरही आरोप आहेत. त्यांच्यावर खटले आहेत. साध्वी प्रज्ञा या जामिनावर आहेत. त्यामुळं जर, जामिनावरच्या माणसाने निवडणूक लढवायची नसेल, तर राहुल आणि सोनियांनाही निवडणूक लढवता येणार नाही, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha elections 2019 : काँग्रेस अंबानी, कोटक यांच्या जीवावर चालणारा पक्ष : तावडे Description: LS elections 2019 : ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यावरून विनोद तावडे यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केलाय.
Loading...
Loading...
Loading...