VIDEO: मनसेचे नेते अभिजीत पानसे यांचा मोठा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 22:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा मुंबईत नुकतीच पार पडली. या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेला संबोधित केलं. मात्र, त्यापूर्वी मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाहूयात

Abhijit Panse
मनसेचे नेते अभिजीत पानसे  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर सभा घेत भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या सभांमध्ये राज ठाकरे व्हिडिओ क्लिप दाखवून भाजप सरकारच्या योजनांची पोलखोल करत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा आज मुंबईत पार पडली. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मनसे नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि याच दरम्यान मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्याचं पहायला मिळालं. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

अभिजीत पानसे यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की, "गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे मोदी आणि अमित शहा यांच्यावर नुसती टीका करत नाहीयेत तर स्क्रीन्सवर पुरावे सुद्धा दाखवत आहेत. मुंबईत मनसेची सभा रोखण्यासाठी रडीचा डाव खेळण्यात आला. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी हरिसाल येथे जावून सत्य परिस्थिती दाखवण्यात आली. हरिसालचा मुलगा स्टेजवर आला आणी खरी परिस्थिती सर्वांना कळली. यानंतर एक युनीट पाठवून तेथे एका मुलाने फेसबुक लाइव्ह केलं की येथे इंटरनेट कसं सुरू आहे आणि हरिसाल कसं डिजिटल आहे".

यानंतर पुढे अभिजीत पानसे म्हणाले की, हरिसाल संदर्भात एक गौप्यस्फोट मी मुख्यमंत्र्यांविषयी करतो. महाराष्ट्राची स्थिती व्हिडिओसह राज ठाकरे महाराष्ट्राला दाखवत आहेत. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या-ज्या मुलांनी खऱ्या मुलाखती दिल्या आहेत त्या मुलांना मुख्यमंत्री कार्यालयातून आणि त्यांच्या जवळचे या मुलांना धमक्या देत आहेत. तसेच त्यांच्यावर प्रेशर आणून आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने बोलायला लावत आहेत. मग हे व्हिडिओ तयार करुन तुमच्यासमोर मांडत आहेत".

यापूर्वी सुद्धा अभिजीत पानसे यांनी आपल्या पुण्यातील जाहीर सभेत एक गौप्यस्फोट केला होता. पुण्यातील सभेत अभिजीत पानसे यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि वकिलांची एक बैठक घेतली. या बैठकीचा विषय होता राज साहेबांच्या सभा कशा थांबवण्यात येतील. तसेच त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करता येईल की ज्यामुळे राज साहेबांचा मतदानाचा अधिकार काढता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी