लोकसभा निवडणूक निकाल: मुंबई ते विदर्भ... पाहा महाराष्ट्रातील विभागवार निकाल... फक्त एका क्लिकवर

Lok sabha elections 2019 Result LIVE: लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल आज जाहीर होत असून टाइम्स नाऊ मराठी आपल्यासाठी विभागवार निकाल घेऊन आलं आहे. पाहा आपल्या विभागातील विजयी उमेदवार

 region new_Times Now
लोकसभा २०१९: मुंबई ते विदर्भ.. महाराष्ट्रातील विभागवार निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ ही सर्वात आतापर्यंतची सर्वात मोठी मतदान प्रकिया ठरली आहे. तब्बल सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल आज (२३ मे २०१९) जाहीर होत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निकालाचे सुपरफास्ट अपडेट हे आपण timesnowmarathi.com वर पाहू शकतात. संपूर्ण देशासोबतच महत्त्वाच्या राजकीय पक्षांचं लक्ष हे महाराष्ट्रातील निकालांवर देखील असणार आहे. कारण की, उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात आहेत. तब्बल ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रावर सर्वांचीच नजर आहे.

पाहा महाराष्ट्रातील निकाल ते देखील विभागवार: 

मुंबई कोकण
पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र
मराठवाडा विदर्भ

महाराष्ट्रातील अनेक लढतींची चर्चा ही राष्ट्रीय पातळींवर देखील झाली आहे. त्यामुळे आता अशा जागांवर कोण बाजी मारणार हे देखील थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग हा राजकीयदृष्ट्या फारच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच टाइम्स नाऊ मराठी आपल्यासाठी विभागवार निकालांचे अपडेट घेऊन आलं आहे.

आपल्या मतदारसंघांसोबतच आपल्या विभागातील कोणत्या उमेदवाराने बाजी मारली याची जवळपास सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. यामुळेच आपल्यासाठी विभागवार निकाल आम्ही घेऊन आलो आहोत. तसं पाहता निवडणुकीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सहा विभाग आपल्याला दिसून येतात. हे सहाही विभाग मिळून राज्यात एकूण ४८ जागा आहेत. या सगळ्याचा जागांचा निकाल आपण इथे पाहू शकतात.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती आणि आघाडीने राज्यात अक्षरश: प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यात शेवटच्या क्षणी शिवसेनेने भाजपशी युती करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे या युतीचा नेमका फायदा कुणाला होणार हे थोड्याच वेळात जाहीर होईल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यंदाची निवडणूक ही फारच प्रतिष्ठेची केली आहे. पण असं असलं तरी आघाडीत महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यात म्हणावा तसा जोर लावलेला दिसून आला नाही. त्यामुळे राज्यात आघाडी कुठवर बाजी मारणार हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी