महाराष्ट्र विभागवार निकाल : पाहा मराठवाडा विभागातील ८ मतदारसंघाचे निकाल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 08:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathwada Result: २०१४ साली मराठवाडा विभागातून काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. याशिवाय संपूर्ण राज्यात त्यांना कुठेही यश मिळालं नव्हतं. त्यामुळे या दोन्ही जागा टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

marathwada result
पाहा मराठवाडा विभागातील ८ जागांचे निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

औरंगाबाद: मराठवाडा विभागात २०१४ साली युतीच्या उमेदवारांनी आठपैकी सहा जागी विजय मिळवला होता. त्यामुळे आता यंदाही हिच कामगिरी ते करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठावाड्यात शिवसेना आणि भाजप अशी दोन्ही पक्षांची बरीच ताकद आहे. पण त्याचबरोबर नांदेड आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी गेल्या वेळेस काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे आता या दोन जागांवर विजय मिळवण्याचं आव्हान युतीसमोर असणार आहे. मराठवाड्यात यंदा बराच दुष्काळही पडला आहे. त्यामुळे याचा काही परिणाम निकालावर होईल का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पाहा मराठवाडा विभागात नेमका निकाल काय आहे: 

पाहा मराठवाडा विभागातील ८ मतदारसंघाचे निकाल:

औरंगाबाद बीड
लातूर उस्मानाबाद
जालना हिंगोली
नांदेड परभणी

मराठवाडा विभागात सर्वाधिक चर्चा ही औरंगाबाद, जालना, बीड आणि नांदेड या मतदारसंघाबाबत असणार आहे. औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा ते बाजी मारणार की, वंचित बहुजन आघाडीचा करिश्मा दिसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर जालना मतदारसंघात यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण निवडणुकीच्या काही दिवसांपर्यंत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी त्यांना बराच विरोध केला होता. दुसरीकडे बीडमध्ये प्रीतम मुंडे यांना यंदाची लोकसभा निवडणूक फार सोप्पी असेल असं वाटत नाही. तर नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना देखील भाजपच्या प्रताप चिखलीकर यांच्याकडून चांगली टक्कर मिळू शकते. 

मराठवाडा विभागातील ८ मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार: 

  1. औरंगाबाद: चंद्रकांत खैरे (शिवसेना)    सुभाष झांबड (काँग्रेस)
  2. बीड: प्रीतम मुंडे (भाजप)     बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
  3. लातूर: सुधाकर श्रंगारे (भाजप)    मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
  4. उस्मानाबाद: ओमराजे निंबाळकर (शिवसेना)    राणा जगजित सिंह पाटील (राष्ट्रवादी)
  5. जालना: रावसाहेब दानवे (भाजप)      विलास औताडे (काँग्रेस)
  6. हिंगोली: हेमंत पाटील (शिवसेना)      सुभाष वानखेडे (काँग्रेस)
  7. नांदेड: प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)      अशोक चव्हाण (काँग्रेस)
  8. परभणी: संजय जाधव (शिवसेना)     राजेश विटेकर (राष्ट्रवादी)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महाराष्ट्र विभागवार निकाल : पाहा मराठवाडा विभागातील ८ मतदारसंघाचे निकाल Description: Marathwada Result: २०१४ साली मराठवाडा विभागातून काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. याशिवाय संपूर्ण राज्यात त्यांना कुठेही यश मिळालं नव्हतं. त्यामुळे या दोन्ही जागा टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles