महाराष्ट्र विभागवार निकाल: पाहा उत्तर महाराष्ट्र विभागातील ८ मतदारसंघाचे निकाल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 08:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

North Maharashtra Result: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या मतदारसंघाची बरीच चर्चा रंगली होती. त्यामुळे या मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्रात कोण बाजी मारतं याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

North maha result_Times Now
पाहा उत्तर महाराष्ट्र विभागातील ८ जागांचे निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

नाशिक: २०१४ लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देखील असंच यश पुन्हा मिळेल अशी युतीला आशा आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील बराच प्रचार केला आहे. त्यामुळे यंदा येथे युती आणि आघाडीमध्ये थेट आणि तितकीच आक्रमक लढत पाहायला मिळू शकते. या विभागात ८ मतदार संघ आहेत. त्यामुळे या आठ पैकी युतीच्या पारड्यात किती जागा येतात यावर बरंचसं गणित अवलंबून आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अशीही चर्चा आहे की, यंदा काही धक्कादायक निकाल येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या विभागातील सर्व मतदारसंघाचे अपडेट आणि अंतिम निकाल आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

पाहा उत्तर महाराष्ट्र विभागातील ८ मतदारसंघाचे निकाल:

नाशिक अहमदनगर
जळगाव धुळे
रावेर दिंडोरी
शिर्डी नंदूरबार

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ हा अहमदनगर आहे. कारण या मतदारसंघातील उमेदवारावरून बरंच राजकारण रंगलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून बराच राजकीय धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे या मतदार संघातील निकालावर संपूर्ण देशाची नजर असणार आहे.  दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे नाशिक. कारण या मतदारासंघातून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे निवडणूक लढवणार आहेत. तसंच या मतदारसंघाची एक अशीही खासियत आहे की, येथे एकदा निवडून आलेला खासदार हा पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आल्यास मोठा विक्रम रचू शकतात. तर दुसरीकडे भुजबळांनी देखील येथे बराच जोर लावला आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातील ८ मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार:

  1. नाशिक: हेमंत गोडसे(शिवसेना)    समीर भुजबळ(राष्ट्रवादी)
  2. जळगाव: उन्मेश पाटील (भाजप)    गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
  3. धुळे: डॉ. सुभाष भामरे (भाजप)    कुणाल पाटील (काँग्रेस)
  4. रावेर: रक्षा खडसे (भाजप)    उल्हास पाटील (काँग्रेस)
  5. दिंडोरी: भारती पवार (भाजप)    धनराज महाले (काँग्रेस)
  6. अहमदनगर: डॉ. सुजय विखे (भाजप)    संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
  7. शिर्डी: सदाशिव लोखंडे (शिवसेना)    भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) 
  8. नंदूरबार: हिना गावित (भाजप)    के. सी. पाडवी (काँग्रेस)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी