महाराष्ट्र विभागवार निकाल: पाहा विदर्भ विभागातील १० मतदारसंघाचे निकाल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 08:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vidarbha Result: लोकसभा निवडणुकीत विदर्भ विभागात १० मतदारसंघ असल्याने या ठिकाणी विजय मिळवून संसदेत आपली सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार आहे.

vidharbha result_Times Now
पाहा विदर्भ विभागातील १० जागांचे निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

नागपूर: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राज्यात युतीची विशेषकरून भाजपची सारी भिस्त ही विदर्भ विभागावरच आहे. कारण २०१४ मध्ये विदर्भातील १० पैकी १० जागांवर युतीचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे यंदा देखील मतदार असाच कौल देतील अशी आशा युतीच्या नेत्यांना वाटत आहे. जर गेल्या वेळेप्रमाणेच मतदारांनी भाजप-सेनेला कौल दिला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचंच वर्चस्व दिसून येईल. पण काही रिपोर्ट्सनुसार विदर्भात भाजपविषयी बरीच नाराजीही आहे. त्यामुळे आता या नाराजीचा फटका भाजपला बसणार की मतदार पुन्हा एकदा त्यांच्याच पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता विदर्भातील निकालावर बरंच काही अवलंबून आहे. विदर्भातील १० मतदारसंघातील निकालाचे अपडेट:    

पाहा विदर्भ विभागातील १० मतदारासंघाचे निकाल:

नागपूर अमरावती
यवतमाळ चंद्रपूर
बुलडाणा अकोला
वर्धा गडचिरोली
भंडारा-गोंदिया रामटेक

विदर्भातील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे नागपूर. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे निवडणूक लढवत आहे. एकीकडे असंही म्हटलं जात आहे की, जर यंदा भाजप बहुमतापासून दूर राहिला आणि जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करावी लागली तर अशावेळी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर येऊ शकतात. दरम्यान, आतापर्यंत तरी गडकरींनी आपण पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसल्याचं अनेकदा म्हटलं आहे. पण ही चर्चा मध्ये-मध्ये सुरूच आहे. पण असं असलं तरी नागपूरमधून गडकरींना काहीही करून विजय मिळवणं गरजेचं आहे. नागपूरमध्ये गडकरींसमोर काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी देऊन तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देशावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

विदर्भ विभागातील १० मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार:

  1. नागपूर: नितीन गडकरी (भाजप)    नाना पटोले (काँग्रेस)
  2. अमरावती: आनंदराव अडसूळ (शिवसेना)    नवनीत राणा 
  3. यवतमाळ: भावना गवळी (शिवसेना)    माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
  4. चंद्रपूर: हंसराज अहिर (भाजप)    सुरेश धानोरकर (काँग्रेस)
  5. बुलडाणा: प्रतापराव जाधव (शिवसेना)    राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
  6. अकोला: संजय धोत्रे (भाजप)    हिदायत पटेल (काँग्रेस)
  7. वर्धा: रामदास तडस (भाजप)    चारुलता टोकस (काँग्रेस)
  8. गडचिरोली: अशोक नेते (भाजप)    नामदेव उसेंडी (काँग्रेस)
  9. भंडारा-गोंदिया: सुनील मेंढे (भाजप)    नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
  10. रामटेक: कृपाल तुमाणे (शिवसेना)    किशोर गजभिये (काँग्रेस)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी