‘जयकांत शिक्रे’ला जनतेनं नाकारलं, ‘सिंघम’ ठरले नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 20:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध दंड थोपाटणारे अभिनेते प्रकाश राज यांना जनतेनं नाकारलंय.प्रकाश राज यांनी बंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली.मात्र त्यांना २ टक्के मतं मिळाली

Prakash Raj
प्रकाश राज यांना जनतेनं नाकारलं  |  फोटो सौजन्य: Times of India

बंगळुरू : ‘सिंघम’ चित्रपटात राजकारणाच्या बाबतीत ‘जयकांत शिक्रे’सोबत जे घडलं ते प्रत्यक्षात घडतांना दिसलं नाही. सिंघममध्ये जयकांत शिक्रे निवडणूक जिंकला होता. मात्र प्रत्यक्षात अभिनेते प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विविध मुद्द्यांवरुन टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांना बंगळुरूच्या जनतेनं नाकारलंय. लोकांनी दिलेल्या निकालानंतर प्रकाश राज यांनी ट्विट करत आपला पराभव मान्य केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रकाश राज नरेंद्र मोदींविरोधात बोलतांना दिसत होते. कर्नाटकातून निवडणूक रिंगणात ते उतरले. मात्र कोणत्याही पक्षाची साथ न घेता. प्रकाश राज यांनी बंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात भाजपचे पी. सी. मोहन आणि काँग्रेसचे रिझवान अर्शद हे निवडणूक रिंगणात होते. आज निवडणुकीचा निकाल लागतोय. बंगळुरू मध्य मतदारसंघात भाजपच्या पी. सी. मोहन आणि काँग्रेसच्या रिझवान अर्शद यांच्यात चुरशीची लढाई बघायला मिळतेय. मात्र प्रकाश राज यांना जनतेनं सपशेल नाकारलं आहे. त्यामुळं प्रकाश राज यांनी ट्विट करून आपला पराभव मान्य केलाय.

पाहा काय म्हणाले प्रकाश राज...

 

 

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये जनतेनं आपल्या चांगलीच थोबाडीत मारली, असं म्हटलंय. ट्रोलिंग, शिवीगाळ आणि अतिशय वाईट शब्दातील प्रतिक्रिया आता येतील. पण मी माझ्या जागेवर ठाम उभा आहे आणि धर्मनिरपेक्ष देशासाठी मी असाच लढत राहिल. माझ्या या प्रवासात ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे आभार, असं प्रकाश राज यांनी म्हटलंय.

बंगळुरु मध्य लोकसभा मतदार संघातून प्रकाश राज यांनी अपक्ष अर्ज भरला होता. मागील काही वर्षांमध्ये प्रकाश राज यांनी देशातील बुद्धीवादी विचारवंतांची झालेली हत्या, गो-रक्षकांनी केलेल्या हिंसाचारावरुन मोदींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये प्रकाश राज यांना जनतेची साथ मिळाली नाहीय. केवळ २ टक्के लोकांनी प्रकाश राज यांना मत दिलं आहे.

प्रकाश राज टॉलिवूड आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांची ‘सिंघम’ चित्रपटातील जयकांत शिक्रे ही भूमिका खूप गाजली होती. प्रकाश राज यांनी भाजप विरोधात लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. राज्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी प्रकाश राज यांनी दोन सभा घेतल्या होत्या. प्रकाश राज यांच्या पराभवासोबतच ज्यांच्यासाठी सभा घेतली ते राजू शेट्टी हे सुद्धा पराभवाच्या छायेत दिसून येत आहेत.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘जयकांत शिक्रे’ला जनतेनं नाकारलं, ‘सिंघम’ ठरले नरेंद्र मोदी Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध दंड थोपाटणारे अभिनेते प्रकाश राज यांना जनतेनं नाकारलंय.प्रकाश राज यांनी बंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली.मात्र त्यांना २ टक्के मतं मिळाली
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles