Lok Sabha election 2019: ११०० कोटींची संपत्ती असलेल्या उमेदवाराला मिळाली अवघे ११०२ मते

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 21:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर झालेत. आता प्रत्येक मतदारसंघातील काही वेगळेपण समोर येतंय. बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघातील एका उमेदवाराला अवघी ११०२ मतं मिळाली आहेत. हे उमेदवार ११०० कोटी रुपयांचे मालक आहेत

Ramesh Kumar Sharma
११०० कोटींच्या मालकाला मिळाले ११०२ मतं 

पाटणा: लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर होतोय. निकाल आणि समोर येणाऱ्या कलानुसार पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार सत्ता स्थापन करेल. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतंय, इतकं संख्याबळ भाजपला मिळालंय. २०१४ सालच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा यंदा एनडीएला मिळण्याचं चिन्ह दिसतंय. जसाजसा निकाल समोर येतोय तसातशी उमेदवारांबाबत नवनवीन माहिती समोर येतेय. अशातच सध्या चर्चा आहे एका उमेदवाराची जो ११०० कोटी रुपयांचा मालक आहे.

चर्चेत असलेले हे उमेदवार आहेत रमेश कुमार शर्मा. ६३ वर्षीय रमेश शर्मा बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवणुकीत उभे होते. रमेश शर्मा यांचा पाटलीपुत्र मतदारसंघातून दारुण पराभव झालाय. विशेष म्हणजे त्यांना फक्त ११०२ मतं मिळाले आहे तर रमेश कुमार शर्मा या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवरांपैकी एक होते. मिळालेल्या माहितीनुसार शर्मा यांच्याजवळ ११०० कोटींची संपत्ती आहे. रमेश यांची लढाई पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम कृपाल यादव आणि आरजेडीच्या मीसा भारती यांच्यासोबत होती. दुसऱ्या क्रमांकासाठी रमेश शर्मा यांना आरजेडीच्या मीसा भारतीविरोधात चांगले उमेदवार मानलं जात होतं. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या रमेश शर्मा यांचं निवडणूक चिन्ह जहाज होतं.

नेते झालेले रमेश कुमार शर्मा हे व्यवसायानं इंजीनिअर आणि बिझनेसमन आहेत. त्यांचं वय ६३ वर्ष आहे. रमेश शर्मा हे शिप रिसायकलिंगसोबत निगडित कंपनीचे मालक आहेत. ते मूळचे पाटलीपुत्र इथले रहिवासी आहेत. रमेश कुमार शर्मा एकूण ११ कंपन्यांचे मालक आहेत. त्यांच्या ११ कंपन्यांमध्ये मल्टी मेरिन सर्व्हिसेज लिमिटेड, मरमरी शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड, अपना इंटरनेमँट लिमिटेड, अमारा फिल्म प्रॉडक्शन लिमिटेड, फूजी पिक्चर अँड सिनेमा लिमिटेड, फूजी इंजीनिअरिंग लिमिटेड सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी तब्बल ३९ जागांवर एनडीएला विजय मिळण्याचे चिन्ह आहेत. तर काँग्रेसला फक्त १ मतदारसंघ आपल्याकडे राखता येईल, असं चित्र सध्या दिसतंय. देशात सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फटका बसलाय. उत्तरप्रदेशच्या अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपच्या मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा दारुण पराभव केलाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha election 2019: ११०० कोटींची संपत्ती असलेल्या उमेदवाराला मिळाली अवघे ११०२ मते Description: लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल जाहीर झालेत. आता प्रत्येक मतदारसंघातील काही वेगळेपण समोर येतंय. बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघातील एका उमेदवाराला अवघी ११०२ मतं मिळाली आहेत. हे उमेदवार ११०० कोटी रुपयांचे मालक आहेत
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles