देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, भाजपच्या विजयाची ५ महत्त्वाची कारणे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 20:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. जनतेनं पुन्हा एकदा मोदी सरकारला आपला कौल दिलाय. काँग्रेसचा अनेक राज्यांमध्ये सुपडा साफ झालाय. जाणून घ्या यामागची ५ कारणं...

Narendra Modi, Amit Shaha and Rajnath Singh
भाजपच्या विजयाची ही ५ मोठी कारणं  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर होत आहेत. सकाळपासूनच जनतेचा कौल भाजपप्रणित एनडीए सरकारला मिळतांना दिसून आला. भाजप संपूर्ण बहुमतानं विजय मिळविण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. तर विरोधी पक्षाचा सुपडा साफ झालाय. देशानं पुन्हा एकदा राहुल गांधींना नाकारलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दर्शवला आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाआघाडीला चांगलाच फटका बसलेला निकालांमधून दिसून येतंय.

जाणून घ्या भाजपच्या विजयाची ५ महत्त्वाची कारणं

विरोधी पक्षाला नाकारलं – मतदारांनी विरोधी पक्षाचे सर्व आरोप फेटाळत भाजपला मतं दिली आहेत. विरोधी पक्षानं आरोप केले होते की, लोकशाही संकटात आहे आणि देश गुलामगिरीत जाईल. देशाला दोन गुजरात्यांनी संकटात आणलंय. नरेंद्र मोदींनी देशाला संकटात घातलंय. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. नोटाबंदीनं देशाचं नुकसान झालंय. बेरोजगारी वाढलीय, मोदी सरकारनं आपल्या २०१४ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. हे सर्व आरोप विरोधी पक्षानं केले होते, ते जनतेनं नाकारल्याचं निकालावरुन जाहीर होतोय.

राष्ट्रभक्तीचा मुद्दा – विरोधी पक्षांच्या आरोपाकडे जनतेनं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. जनतेसाठी देशभक्ती आणि देशाचं हित महत्त्वाचं ठरलंय. देश सर्वाधिक नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित राहिल, असं जनतेला वाटलं. गेल्या पाच वर्षांमध्ये देशात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या नाहीत. विरोधी पक्षानं आरोप केला होता की, गेल्या पाच वर्षांमध्ये देशाच्या सीमेवर सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. मात्र मतदारांनी त्यांच्या आरोपकडे लक्ष दिलं नाही, उलट त्यांना देशातील इतर मोठ-मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या नाहीत, याचा दिलासा वाटलाय.

केंद्र सरकारच्या योजना – विरोधी पक्षानं कितीही आरोप केले तरी, केंद्र सरकारच्या योजनांचा उपयोग सामान्य जनतेला झाल्याचं दिसून आलंय. या योजनांचा निवडणुकीत खूप परिणाम झाल्याचं दिसून येतंय. केंद्र सरकारच्या शौचालय निर्माण, उज्ज्वला योजना याचा फायदा अनेक कुटुंबांना मिळालाय. या योजनांच्या बाबतीतील आरोप जनतेनं साफ नाकारलेत. तसंच सप-बसप आघाडी, बिहारमधील महाआघाडी, पश्चिम बंगालमधील हिंसा आणि टीएमसीची गुंडगिरी याचा कशाचाही परिणाम मतदारांवर झाला नाही.

भाजपला सहकारी पक्षांची सोबत – लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपनं आपल्या सर्व सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली. निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेतील राज्यातील वाद-प्रतिवाद संपले आणि त्यांनी एकत्र निवडणूक लढवली. शिवाय बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत ५०-५० जागांचं वाटप करून भाजपनं मोठेपणा दाखवला. यासर्वांचा जनतेत एक सकारात्मक संदेश गेला.

भाजपची मजबूत संघटना -  भाजपची संघटना खूप मजबूत आहे. भाजपनं प्रत्येक बूथवर आपल्या कार्यकर्त्यांना कामगिरी बजावली होती. त्यामुळे कार्यकर्ते मतदारांना बूथपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. विरोधी पक्षाकडे मात्र अशा कार्यकर्त्यांची कमतरता दिसून आली. तसंच जातीचं राजकारण नाकारत मतदारांनी मतदान केल्याचं निकालावरुन जाहीर होतंय.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, भाजपच्या विजयाची ५ महत्त्वाची कारणे Description: देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. जनतेनं पुन्हा एकदा मोदी सरकारला आपला कौल दिलाय. काँग्रेसचा अनेक राज्यांमध्ये सुपडा साफ झालाय. जाणून घ्या यामागची ५ कारणं...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles