महाराष्ट्रातील 'या' खासदारांनी आपली जागा पुन्हा राखली

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 18:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीत कुठल्या विद्यमान खासदाराने पुन्हा विजय मिळवला आहे त्यावर एक नजर टाकूयात.

second time member of parliament
दुसऱ्यांदा खासदार झालेल्यांची यादी   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :   २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामीत भाजप आणि शिवसेनेच्या ४१ उमेदवारांना विजय मिळाला. या निवडणुकीत भाजपचे तब्बल २३ खासदार आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. मात्र, यातील केवळ २९ खासदारांना आपली खासदारकी वाचवता आली आहे. त्यातील काहींनी दोनदा आणि काही तीनवेळा यामतदार निवडून येण्यात यश आले आहे.   पाहूयात या गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील किती खासदारांनी आपली जागा राखली आहे. 

या २९ खासदारांपैकी काही जण पाचव्यांदा, तर काही चौथ्यांदा आणि काही तिसऱ्यांदा खासदार झाले आहे. यातील सर्वाधिक पाच वेळा खासदारांच्या यादीत जालना लोकसभेचे खासदार रावसाहेब दानवे आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचा समावेश आहे. तर अकोल्याचे संजय धोत्रे यांनी चौथ्यांदा लोकसभेत जाण्याची कामगिरी केली आहे. तर बारामतीतून सुप्रिया सुळे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांनी आता तिसऱ्यांदा खासदारकी पटाकावली आहे. 

२०१९ मध्ये पुन्हा खासदार झालेल्यांची यादी 

 1. नंदूरबार - हिना गावित
 2. धुळे - सुभाष भांबरे 
 3. रावेर - रक्षा खडसे 
 4. बुलडाणा - प्रतापराव जाधव (३ टर्म खासदार २००९, २०१४ आणि २०१९)
 5. अकोला - संजय धोत्रे (४ टर्म खासदार२००४, २००९, २०१४ आणि २०१९)
 6. वर्धा - रामदास तडस 
 7. रामटेक - कृपाल तुमाणे 
 8. नागपूर - नितीन गडकरी 
 9. गडचिरोली चिमूर - अशोक नेते 
 10. यवतमाळ वाशिम - भावना गवळी (५ टर्म खासदार १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९)
 11. परभणी - संजय जाधव 
 12. जालना - रावसाहेब दानवे (५ टर्म खासदार १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९)
 13. नाशिक - हेमंत गोडसे 
 14. पालघऱ - राजेद्र गावित (गेल्या पोट निवडणुकीत विजयी) 
 15. भिवंडी - कपिल पाटील 
 16. कल्याण - श्रीकांत शिंदे 
 17. ठाणे - राजन विचारे
 18. उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी 
 19. उत्तर पश्चिम - गजानन कीर्तीकर 
 20. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 
 21. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत 
 22. दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
 23. मावळ - श्रीरंग बारणे 
 24. बारामती - सुप्रिया सुळे (३ टर्म खासदार २००९, २०१४ आणि २०१९)
 25. शिर्डी - सदाशिव लोखंडे 
 26. बीड - प्रीतम मुंडे 
 27. सांगली - संजयकाका पाटील 
 28. सातारा - उदयराजे भोसले (३ टर्म खासदार २००९, २०१४ आणि २०१९)
 29. रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजप-शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना विजय मिळाला. या निवडणुकीत भाजपचे तब्बल २३ खासदार आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या विद्यमान खासदारांपैकी अनेकांचं तिकीट कापल्याचं समोर आलं आहे. पाहूयात या गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील किती खासदारांनी आपली जागा राखली आहे. 

२०१४ मध्ये पुन्हा झालेल्या खासदारांची यादी 

मतदारसंघ - अहमदनगर

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - दिलीप गांधी - भाजप - २,०९,१२२ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - दिलीप गांधी - भाजप - ४६,७३१ मतांनी विजयी 

मतदारसंघ - अकोला

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - संजय धोत्रे - भाजप - २,०३,११६ मतांनी  विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - संजय धोत्रे - भाजप - ६४,७३१ मतांनी विजयी

मतदारसंघ - अमरावती

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - आनंदराव अडसूळ - शिवसेना - १,३७,९३२ मतांनी विजयी 
 2. लोकसभा निवडणूक २००९ - आनंदराव अडसूळ - शिवसेना - ६१,७१६ मतांनी विजयी

मतदारसंघ - औरंगाबाद

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - चंद्रकांत खैरे - शिवसेना - १,६२,००० मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९- चंद्रकांत खैरे - शिवसेना - ३३,०१४ मतांनी विजयी 

मतदारसंघ - बारामती

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस - ६९,७१९ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस - ३,३६,८३१ मतांनी विजयी 

मतदारसंघ - बीड

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - गोपीनाथ मुंडे - भाजप - १,३६,४५४ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - गोपीनाथ मुंडे - भाजप - १,४०,९५२ मतांनी विजयी

मतदारसंघ - बीड - २०१४ लोकसभा पोटनिवडणूक निकाल

 1. डॉ. प्रीतम मुंडे - भाजप - ९,२२,४१६ मतं
 2. अशोकराव पाटील - काँग्रेस - २,२६,०९५ मतं 

मतदारसंघ - बुलढाणा

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - प्रतापराव जाधव - शिवसेना - १,५९,५७९ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - प्रतापराव जाधव - शिवसेना - २८,०७८ मतांनी विजयी

मतदारसंघ - चंद्रपूर

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - हंसराज अहिर - भाजप - २,३६.२६९ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - हंसराज अहिर - भाजप - ३२,४९५ मतांनी विजयी

मतदारसंघ - दिंडोरी

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - हरिश्चंद्र चव्हाण - भाजप - २,४७,६१९ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - हरिश्चंद्र चव्हाण - भाजप - ३७,३४७ मतांनी विजयी

मतदारसंघ - हातकणंगले

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना - १,७७,८१० मतांनी विजयी 
 2. लोकसभा निवडणूक २००९ - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना - ९५,०६० मतांनी विजयी

मतदारसंघ - जळगाव

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - ए.टी. नाना पाटील - भाजप - ३,८३,५२५ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - ए.टी. नाना पाटील - भाजप - ९६,०२० मतांनी विजयी 

मतदारसंघ - जालना

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - रावसाहेब दानवे - भाजप - २,०६,७९८ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - रावसाहेब दानवे - भाजप - ८,४८२ मतांनी विजयी

मतदारसंघ - रायगड

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - अनंत गीते - शिवसेना - २,११० मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ -अनंत गीते - शिवसेना - १,४६,५२१ मतांनी विजयी

मतदारसंघ - सातारा

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी काँग्रेस - ३,६६,५९४ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी काँग्रेस - २,९७,५१५ मतांनी विजयी

मतदारसंघ - शिरुर

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - शिवाजीराव आढळराव पाटील - शिवसेना - ३,०१,८१४ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - शिवाजीराव आढळराव पाटील - शिवसेना - १,७८,६११ मतांनी विजयी

मतदारसंघ - यवतमाळ

 1. लोकसभा निवडणूक २०१४ - भावना गवळी - शिवसेना - ९३,८१६ मतांनी विजयी
 2. लोकसभा निवडणूक २००९ - भावना गवळी - शिवसेना - ५६,९५१ मतांनी विजयी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महाराष्ट्रातील 'या' खासदारांनी आपली जागा पुन्हा राखली Description: लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीत कुठल्या विद्यमान खासदाराने पुन्हा विजय मिळवला आहे त्यावर एक नजर टाकूयात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
 १३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
१३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात, आज राज्यात सभांचा महापूर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात, आज राज्यात सभांचा महापूर
[VIDEO] पंतप्रधान मोदींनी पुण्यात आळवला कलम ३७०चा राग, पाहा मोदींची संपूर्ण सभा
[VIDEO] पंतप्रधान मोदींनी पुण्यात आळवला कलम ३७०चा राग, पाहा मोदींची संपूर्ण सभा