अभेद्य आहे प्रीतम मुंडे यांचा सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाहा देशात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये कोण-कोण आहेत.

pritam munde
अभेद्य आहे प्रीतम मुंडे यांचा सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम  |  फोटो सौजन्य: फेसबुक

मुंबई :  निवडणुकांमध्ये आजपर्यंत तुम्ही एक लाख, दोन लाख, तीन लाख फार फार तर चार लाख मतांनी उमेदवार विजयी झाल्याचं ऐकलं असेल. पण असाही एक मतदारसंघ आहे जेथे उमेदवाराने तब्बल सात लाख मतांनी विजय मिळवला आहे. होय, हा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातील. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार यांनी २०१४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत जवळपास सात लाख मतांनी विजय मिळवला होता.

भाजपच्या बीड येथील विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी २०१४ च्या पोट निवडणुकीत मिळविलेला विजय अद्यापही सर्वात मोठा विजय म्हणून आबाधित आहेत. प्रितम मुंडे यांना या निवडणुकीत सुमारे ६ लाख ९६ हजार ३२१ मते मिळाली होती. यंदा हा विक्रम तुटू शकत होता पण गुजरातच्या नवसारी मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सी. आर. पाटील या विक्रमाच्या जवळ आले होते. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या धर्मेश भाई पटेल यांना ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभूत केले. 

सी आर पाटील यांना ९ लाख ७२ हजार ७३९ मते पडली. तर काँग्रेसच्या धर्मेशभाई पटेल यांना  २ लाख ८३ हजार ७१ मते पडली.

२०१९ लोकसभा  निकाल (मतदारसंघ - नवसारी)

 1. सी आर पाटील - भाजप - ९ लाख ७२ हजार ७३९ मतं
 2. धर्मेशभाई पटेल - काँग्रेस - २ लाख ८३ हजार ७१ मतं 

भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी विजय.

२०१४ लोकसभा पोटनिवडणूक निकाल (मतदारसंघ - बीड)

 1. डॉ. प्रीतम मुंडे - भाजप - ९,२२,४१६ मतं
 2. अशोकराव पाटील - काँग्रेस - २,२६,०९५ मतं 

भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा तब्बल ६,९६,३२१ मतांनी विजय.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, काही दिवसांतच त्यांचं निधन झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नव्हता, वडिलांच्या निधनाने त्यांना सहानुभूती होती तसेच मोदी लाटेचाही फायदा त्यांना झाला. परिणामी प्रीतम मुंडे या जवळपास सात लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या.

२०१४ लोकसभा निवडणूक निकाल (मतदारसंघ - बीड)

 1. गोपीनाथ मुंडे - भाजप - ६,३५,९९५ मतं
 2. सुरेश धस - राष्ट्रवादी काँग्रेस - ४,९९,५४१ मतं

पाहा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार

 1. सी. आर. पाटील - भाजप - नवसारी मतदारसंघ - ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी विजयी 
 2. संजय भाटिया- भाजप - कर्नाल मतदारसंघ - ६ लाख ५६ हजार १४२ मतांनी विजयी 
 3. किशन पाल- भाजप - फरिदाबाद मतदारसंघ - ६ लाख ३८ हजार २३९ मतांनी विजयी 
 4. सुभाष बहेरिया- भाजप - भिलवाडा मतदारसंघ - ६ लाख १२ हजार मतांनी विजयी 
 5. रंजनाबेन भट्ट - भाजप- वडोदरा मतदारसंघ - ५ लाख ८९ हजार १७७ मतांनी विजयी
 6. परवेश वर्मा - भाजप -  पश्चिम दिल्ली -   ५ लाख ७८ हजार ४८६ मतांनी विजयी
 7. चंद्रप्रकाश जोशी - भाजप -  चित्तोडगड -   ५ लाख ७६ हजार २४७ मतांनी विजयी
 8. अमित शहा- भाजप -  गांधीनगर  -   ५ लाख ५७ हजार १४ मतांनी विजयी
 9. उदय सिंग- भाजप - होशंगाबाद  -   ५ लाख ५३ हजार ६८२ मतांनी विजयी 
 10. शंकर ललवाणी - भाजप- इंदूर - ५ लाख ४७ हजार ७५४ मतांनी विजयी 

पाहा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार

 1. नरेंद्र मोदी - भाजप - वडोदरा मतदारसंघ - ५,७०,१२८ मतांनी विजयी 
 2. विजय कुमार सिंग - भाजप - गाझियाबाद मतदारसंघ - ५,६७,२६० मतांनी विजयी
 3. सी. आर. पाटील - भाजप - नवसारी मतदारसंघ - ५,५८,११६ मतांनी विजयी
 4. रमाचंद्र बोहरा - भाजप - जयपूर मतदारसंघ - ५,३९,३४५ मतांनी विजयी
 5. दर्शना जरदोश - भाजप - सुरत मतदारसंघ - ५,३३,१९० मतांनी विजयी 
 6. संकर प्रसाद दत्ता - भारतीय कम्युनिस्ट पक्ष - त्रिपुरा पश्चिम मतदारसंघ - ५,०३,४८६ मतांनी विजयी
 7. जितेंद्र चौधरी - भारतीय कम्युनिस्ट पक्ष - त्रिपुरा पूर्व मतदारसंघ- ४,८४,३५८ मतांनी विजयी 
 8. लालकृष्ण अडवाणी - भाजप - गांधीनगर मतदारसंघ - ४,८३,१२१ मतांनी विजयी
 9. सुमित्रा महाजन - भाजप - इंदूर मतदारसंघ - ४,६६,९०१ मतांनी विजयी
 10. क्रिशन पाल - भाजप - फरिदाबाद मतदारसंघ - ४,६६,८७३ मतांनी विजयी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अभेद्य आहे प्रीतम मुंडे यांचा सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम Description: पाहा देशात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये कोण-कोण आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles