Lok sabha 2019: तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या, सुप्रिया सुळेंपासून थेट राणेंपर्यंत अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 18:56 IST | रोहित गोळे

Lok sabha elections 2019: लोकसभा निवडणूक २०१९ साठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून यावेळी अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे या बिग फाईट्सकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

vote
तिसऱ्या टप्प्यातील मतदान (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

 • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या लढती
 • पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अटतटीच्या लढती होण्याची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेला प्रचार तोफा अखेर काल (रविवार) थंडावल्या आहेत. त्यामुळे आता उमेदवारांसाठी उद्याच्या दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सर्वच उमेदवारांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आता उमेदवार देखील शेवटच्या क्षणी अतिशय सावध झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात तब्बल १४ जागांवर मतदान पार पडणार आहे. यापैकी अनेक जागा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक ठिकाणी मोठ्या लढती पाहालया मिळणार आहेत. तसेच अनेक मतदारसंघात उमेदवारांच्या प्रतिष्ठाही पणाला लागल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेले मतदारसंघ म्हणजे अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, जालना, कोल्हापूर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे आहेत. या निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवार हा तेवढाच तुल्यबळ असल्याने नेमकं कोण बाजी मारणार याबाबत अद्याप तरी चित्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळू शकते. 

तिसऱ्या टप्प्यात  अनेक महत्त्वाच्या लढती होणार आहेत. यावेळी अनेक तुल्यबळ नेते आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढतींवर एक नजर:

 1. अहमदनगर: भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यात थेट लढत 
 2. बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना युतीच्या कांचन कूल बारामतीतून कडवं आव्हान देऊ शकतात. 
 3. सातारा: तसं पाहता सातारा ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी आतापर्यंत सेफ जागा मानली जात होती. त्याचं कारण म्हणजे उदयनराजे भोसले. पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांनी त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.  
 4. माढा: बारामतीप्रमाणेच माढा मतदारसंघ देखील राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातील स्वत: शरद पवार हे येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, पण अखेर राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना येथून उमेदवारी दिली. तर दुसरीकडे भाजपने ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 
 5. रत्नागिरी-सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीत कोकणातील या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण येथे नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेनेने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देऊ केली आहे. मागील निवडणुकीत राऊतांनी निलेश राणेंचा पराभव केला होता. त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 6. रायगड: कोकणातील आणखी एक महत्त्वाची जागा म्हणजे रायगड मतदारसंघ. या मतदारसंघातून शिवसेनेने केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना तिकीट दिलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरेंना उमेदवारी देऊन गीतेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते हे फारच कमी मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी देखील सुनील तटकरेंनी त्यांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे आता गीतेंसमोरील आव्हान आणखी कठीण असणार आहे. 
 7. कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपलं वर्चस्व कायम ठेवणार की, यंदा शिवसेना बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय मंडलिक यांना तिकीट दिलं आहे.  
 8. जालना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालन्यातून उमेदवार असतील. तर काँग्रेसचे विलास औताडे त्यांना आव्हान देतील 

 

लोकसभा निवडणुकीत तिसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या निवडणुकीवर अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या मतदारसंघात होणार निवडणूक यावर एक नजर: 

तिसऱ्या टप्प्यातील मतदान (२३ एप्रिल २०१९ : १४ जागा) 

 1. पुणे 
 2. औरंगाबाद
 3. अहमदनगर 
 4. जळगाव
 5. जालना 
 6. रावेर 
 7. सातारा
 8. सांगली 
 9. रायगड
 10.  माढा
 11.  बारामती
 12.  हातकणंगले 
 13.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग
 14.  कोल्हापूर
   
लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok sabha 2019: तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या, सुप्रिया सुळेंपासून थेट राणेंपर्यंत अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला Description: Lok sabha elections 2019: लोकसभा निवडणूक २०१९ साठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून यावेळी अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे या बिग फाईट्सकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
Loading...
Loading...
Loading...