राजकारणात पदार्पणासाठी रजनीकांत सज्ज, तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 18:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

रजनीकांत यांनी आज आपल्या राजकारणातील पदार्पणाबद्दल घोषणा केलीय. तसंच पुन्हा मोदी सरकार सत्तेत परतणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर रजनीकांत यांनी आपल्याला २३ मे रोजीपर्यंत वाट पाहावी लागेल, असं वक्तव्य केलं.

Rajanikant
रजनीकांत (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

चेन्नई: बॉलिवूड अभिनेते आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी आपण तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी सांगितलं की, जेव्हा विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा निवडणूक लढविण्यासाठी मी तयार आहे. रजनीकांत आपल्या घराबाहेर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. पीएम नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत परततील का? हा प्रश्न विचारला असता, अभिनेते रजनीकांत म्हणाले की, यासाठी आपल्याला २३ मे  या दिवसाची वाट पाहावी लागेल.

निवडणुकीबाबत विचारलं असता दक्षिण भारतातील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटलं की, जर लोकसभा निवडणुकीसोबत होत असलेल्या विधानसभा फेरनिवडणुकीनंतर एआयएडीएमके साठी समस्या निर्माण झाली तर ते निवडणूक लढवायला तयार आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात दोन-दोन हात करायला आपण तयार असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं आहे. २३ मे रोजीनंतर आपण याबद्दल निर्णय घेऊ, असंही रजनीकांत यांनी स्पष्ट केलं.

 

 

तमिळनाडूमध्ये १८ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक आणि ३८ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १८ एप्रिलला झालं. १८ विधानसभा पोटनिवडणुकीत होणारं मतदान हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर या जागांवर एआयएडीएमकेचा पराभव झाला तर राज्यातील सरकार संकटात येईल. तसा तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २०२१ मध्ये संपणार आहे. 

रजनीकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यापूर्वीही आपण २०२१च्या तमिळनाडू विधानसभेसाठी सर्व २३४ जागांवर उमेदवार उतरवणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण विधानसभा पोटनिवडणूक आणि लोकसभा लढवणार नाही, असंही रजनीकांत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांचं संपूर्ण लक्ष हे २०२१मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे.

रजनीकांत यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाबद्दलची उत्सुकता निर्माण केली आहे. रजनीकांत २३ मे रोजीच्या निकालानंतर काय होतं ते बघूया, असंही म्हणाले. म्हणजे जर पोटनिवडणुकीत सध्याचं सरकार त्या जागा जिंकू शकलं नाही तर सरकार पडू शकतं. अशावेळी राज्यात २०२१च्या आधीच निवडणुका होऊ शकतात, म्हणून रजनीकांत २३ मे पर्यंत थांबा, असं म्हणाले. १८ एप्रिलला झालेल्या मतदानात रजनीकांत यांनी आपलं मतदान केलं.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राजकारणात पदार्पणासाठी रजनीकांत सज्ज, तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा Description: रजनीकांत यांनी आज आपल्या राजकारणातील पदार्पणाबद्दल घोषणा केलीय. तसंच पुन्हा मोदी सरकार सत्तेत परतणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर रजनीकांत यांनी आपल्याला २३ मे रोजीपर्यंत वाट पाहावी लागेल, असं वक्तव्य केलं.
Loading...
Loading...
Loading...