पंतप्रधान मोदींच्या जीवनावरील वेब सीरिजवर बंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 20, 2019 | 19:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

मोदींच्या जीवनावर आधारित वेब सीरिज Modi-Journey of a Common Man वर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने इरोस नाऊला आदेश दिले की या वेबसीरिजचे सर्व एपिसोड्ची स्ट्रीमिंग बंद करण्यात यावी.

webseries on pm modi
पंतप्रधानांच्य जीवनावर आधारित वेबसीरिज 

मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकला प्रदर्शित करण्याच्या आधी बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित वेब सीरिज Modi-Journey of a Common Man वरही बंदी घातली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने इरोस नाऊला आदेश दिले की या वेबसीरिजचे सर्व एपिसोड्ची स्ट्रीमिंग बंद करण्यात यावी. 

विवेक ऑबेरॉय स्टारर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर निवडणूक आयोगाने प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी बंदी घातली होती. हा सिनेमा १२ एप्रिलला रिलीज होणार होता. ओमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमावर आरोप होता की यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. सिनेमावर बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाने वेबसीरिजवरही बंदी घातली आहे. एएनआयने ट्विटरवरून ही माहिती दिली. 

असे राजकीय सिनेमे निवडणुकीवर परिणाम करू शकतात. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ही बंदी घातली. दरम्यान, पीएम मोदी बायोपिक प्रकरण निवडणूक आयोगाकडे अटकले आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले होते की, आयोगाने सिनेमाबाबत १९ एप्रिलपर्यंत सीलबंद रिपोर्ट द्यावा. मात्र गुड फ्रायेची सुट्टी असल्याने निवडणूक आयोग हा रिपोर्ट सादर करू शकली नाही. आता २२ एप्रिल अर्थात सोमवारी याप्रकरणी कोर्टात सुनावणी केली जाईल. 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनलेल्या या सीरीजच्या पाच एपिसोडचे प्रक्षेपण झाले आहे. निवडणुकीदरम्यान हे एपिसोड रिलीज करण्यामागे कारण विचारले असता दिग्दर्शक म्हणले हा केवळ योगायोग आहे. गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही यावर काम करत आहोत. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे एपिसोड निवडणुकीच्या काळात प्रक्षेपित करण्यात आले. ऐन निवडणुकीत हे एपिसोड प्रदर्शित करण्यामागचा काही हेतू नव्हता. 

पंतप्रधान मोदी यांच्यावर आधारित वेब सीरिज Modi-Journey of a Common Man उमेश शुक्ला यांनी बनवली आहे. मिहीर भुटा यांनी ही वेबसीरिज लिहिली आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनाचे तीन टप्पे यात दाखवण्यात आले आहेत. यात फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर यांनी मोदींची भूमिका साकारली आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान मोदींच्या जीवनावरील वेब सीरिजवर बंदी, निवडणूक आयोगाची कारवाई Description: मोदींच्या जीवनावर आधारित वेब सीरिज Modi-Journey of a Common Man वर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने इरोस नाऊला आदेश दिले की या वेबसीरिजचे सर्व एपिसोड्ची स्ट्रीमिंग बंद करण्यात यावी.
Loading...
Loading...
Loading...