Nationalist Congress Party Chief Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राजकारणातील असं एक व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त वर्ष राजकारणात घालवली आणि अजूनही राजकारणात त्याचं जोशानं सक्रिय आहेत. त्यांनी १४ वेळा निवडणुका लढवल्या आणि त्यातही एकदाही पराभव झाला नाही. शरद पवार हे राजकारणातले असं धुरंदर व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांना मात करणं खूप कठिण आहे. पवारांनी पहिल्यांदा १९६७ मध्ये राजकारणात पाऊल टाकलं.
शरद पवारांनी ज्या ज्या जागेवरून निवडणूक लढवली त्या त्या जागेवर त्यांचा विजय पक्का असायचा. राजकारणात त्यांना हरवणं कठिण नाही तर अशक्य आहे. शरद पवारांनी तब्बल चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले. यावरूनच लक्षात येतं की, शरद पवारांचा महाराष्ट्र राज्यात किती प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार माढ्यातून लोकसभा निवडणूक अशी चर्चा रंगली होती. पण त्यानंतर स्वतःहून त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. जरी ते निवडणूक लढवत नसले तरी त्यांनी ज्या जागांवरून याआधी निवडणूक लढवली त्या जागा अजूनही एनसीपीच्या खात्यात जमा आहेत.
शरद पवार यांचं नाव पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी ही समाविष्ट करण्यात आलं होतं. पवारांनी केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री या पदाचा कार्यकाळ देखील सांभाळला होता. शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र कुस्ती असोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र ऑलम्पिक संघ, बीसीसीआय, आयसीसी या सर्वांचं अध्यक्षपदावर देखील कार्यरत होते. काँग्रेस पक्षापासून राजकारणाला सुरूवात करणारे शरद पवारांनी मध्येच काँग्रेस पक्षाला रामराम केला होता त्यानंतर पुन्हा एकदा काँगेसमध्ये प्रवेश केला. पण १९९९ साली शरद पवारांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आता गेल्या दोन दशकांपासून शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे या खासदार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवारा हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण पत्रकार परिषदे घेऊन स्वतः पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं घोषित केलं. पण त्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं काही म्हटलं की सर्वांनाच धक्का बसला. त्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी निवृत्तीची भाषा वापरून कार्यकर्त्यांना एकप्रकारचा धक्काच दिला.
गेली ५२ वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे. राजकारणातून बाहेर पडण्याचा कधी तरी विचार करायला हवा, म्हणूनच मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अटलबिहारी वाजपेयी असो की लालकृष्ण अडवाणी यांचा निवडणुकीत कधी ना कधी पराभव झाला आहे. पण मी आजपर्यंत कधीच पराभूत झालो नाही. माझा पराभव आजपर्यंत झाला नाही, पराभव होईल या भीतीने मी निवडणुकीतून माघार घेतल्याचं भाजपाचं वक्तव्य बालिशपणांच असल्याचं ही पवार म्हणालेत.
त्यामुळे शरद पवारांनी नेमकं भाजपला उद्देशहून हे म्हटलं की, खरंच निवृत्तीचे संकेत दिले हे समजायला कदाचित वेळ लागेल.