मोदी-अमित शहा टोळी हरल्यावर आमचं सूतक संपेल : मनसे 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 20:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधानावर मनसे आता आक्रमक झाली आहे.

Raj Thackeray
राज ठाकरेंची मनसे साध्वी वक्तव्यानंतर आक्रमक झाली आहे.   |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई :  भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी २६/११ ला मुंबर्ईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत वादगस्त विधान केले. आता त्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.  आता साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या या वक्तव्यावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून मोदी आणि अमित शहाची टोळी निवडणूक हारेल, तेव्हाच आमचं सूतक संपेल असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन त्यांनी मोदी शहा यांना राजकीय क्षितीजावरून नष्ट करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्याचा भाग म्हणून आज साध्वीच्या वक्तव्यानंतर अमेय खोपकर यांनी मोदी आणि शहा यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. 

एका प्रचार सभेत बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, हेमंत करकरे यांनी मला चुकीच्या पद्धतीने मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात अडकवल होतं. त्यांना मी सांगितलं की, तुमचा सर्वनाश होईल, असा मी त्यांना शाप दिला. असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. या संदर्भात मनसेने आपल्या  मनसे अधिकृत या ट्विटर हँडलच्या माध्यमातून अमेय खोपकर यांचे ट्विट रिट्विट केले आहेत. त्यात अमेय खोपकर यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

अमेय खोपकर यांनी ट्वीट करताना लिहिले की, मुक्ताफळ म्हणावं की गटारगंगा ? स्वत:ला कधी साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे. आमच्या करकरेसाहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपची देशभक्ती कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आमचं सूतक संपेल.  असे म्हटले आहे. 

साध्वीच्या या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या विधानाचा आयपीएस असोसिएशनने निषेध व्यक्त करत ट्वीट केले आहे. तस संभाजी ब्रिगेडने या साध्वीची जीभच कापलीच पाहिजे. दरम्यान, साध्वी विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मोदी-अमित शहा टोळी हरल्यावर आमचं सूतक संपेल : मनसे  Description: भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधानावर मनसे आता आक्रमक झाली आहे.
Loading...
Loading...
Loading...