LIVE नागपूर लोकसभा निवडणूक २०१९  : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरूद्ध भाजपचे माजी खासदार आणि आता काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. 

nagpur loksabha election results 2019
नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ 

नागपूर :  नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा झालेली निवडणूक विकास आणि सरकार विरुद्धची नाराजी हे मुद्दे प्रकर्षाने दिसले आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा दुरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्याभोवती मतदानाचे गणित फिरताना पाहिलं गेलं. गेल्या निवडणुकीत बसप, आप हे देखील प्लेअर होते. त्यांनी १ लाख ६५ हजारांच्या आसपास मते खाल्ली होती. पण यंदा आप आणि बसपचा जोर कमी पडला आहे, तर फक्त एक वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार मते खाणाारा दिसतोय. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचा २ लाख ८४ हजार मतांनी विजय झाला होता. त्यांना ५ लाख ८७ हजार मते पडली होती, तर काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना ३ लाख २ हजार मते पडली होती. बसपच्या मोहन गायकवाड यांना ९६ हजार तर आपच्या अंजली दमानिया यांना ६९ हजार मते पडली होती. 

LIVE UPDATES

 1. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी
 2. नितीन गडकरी यांना 117665 मतांची आघाडी 
 3. नितीन गडकरी यांना 111969 मतांची आघाडी
 4. नितीन गडकरी यांना 95465 मतांची आघाडी
 5. नितीन गडकरी यांना 76770 मतांची आघाडी
 6. नितीन गडकरी यांना 55397 मतांची आघाडी
 7. नितीन गडकरी यांना 46093 मतांची आघाडी
 8. नितीन गडकरी यांना 31529 मतांची आघाडी
 9. नागपूर - नितीन गडकरी , भाजप ३०६६ मतांनी आघाडीवर
 10. पहिल्या फेरीत नितीन गडकरी यांना आघाडी
 11. ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात
 12. मतमोजणी थांबविण्याची काँग्रेसची मागणी, मतदान झालेल्या दोन इव्हीएम मशीनचे रजिस्टऱ नंबर आणि काँग्रेसला दिलेल्या यादीचे इव्हीएम मशीनचे रजिस्टऱ नंबर तफावत.  
 13. टपाल मतमोजणीला सुरूवात
 14. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

यंदा नागपूर लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी २.५१ टक्क्यांनी घटली असली तरी लोकसंख्येची संख्या वाढल्याने एकूण मतदान  ९८,९६० ने वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण १८ लाख ९९ हजार मतदारांपैकी १० लाख ८३ हजार मतदारांनी आपला हक्क बजावला.  तर यंदा हे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाते यावर नितीन गडकरी यांचा विजय ठरणार आहे.  

यंदा आप आणि बसप फॅक्टर नसल्याने त्यांची मते ही काँग्रेसकडे वर्ग होऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येते आहे. त्यामुळे सुमारे १ लाख ६५ हजार मते या दोघांना मागच्या निवडणुकीत मिळाली होती. त्यातील १ लाख जरी मते काँग्रेसकडे वळली तर गडकरींचा लीड कमी होऊ शकतो.  वाढलेले मतदान काँग्रेसच्या पारड्यात पडली तर गडकरींना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो. तसेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार स्ट्राँग नसल्याने त्याचा फायदा काँग्रेसला आहे.  काही कुंपणावरची मते ही सरकार विरोधी नाराजीमुळे काँग्रेसकडे गेली तर गडकरींची सीट धोक्यात मानली जात आहे. 

तरीही आपल्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गडकरींनी नागपूरकरांना मेट्रोची भेट दिली, अवघ्या तीन वर्षा मेट्रो नागपूरमध्ये धावायला लागली आहे. त्याचा फायदा गडकरी यांना होऊ शकतो. तसेच देशात आघाडी सरकारची परिस्थिती निर्माण झाली तर गडकरींकडे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत नागपूरकर गडकरींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करू शकतात असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तशी चर्चा निवडणुकीच्या काळात नागपुरात दिसत होती.   गडकरी निवडून येतील पण खूप कमी मतांनी येऊ शकतात असा अंदाज आहे. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
LIVE नागपूर लोकसभा निवडणूक २०१९  : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी Description: नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरूद्ध भाजपचे माजी खासदार आणि आता काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola