VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिंडोरीत सभेतील ठळक मुद्दे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 12:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Narendra Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आज दोन जाहीर सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे पार पडली. तर दुसरी जाहीर सभा नंदुरबार येथे होणार आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: ANI

नाशिक: लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जाहीर सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील दिंडोरी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर नरेंद्र मोदी नंदुरबार येथे जाहीर सभेला संबोधित केलं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा LIVE पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा

काही दिवसांपूर्वीच डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच पक्षाने त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत भारती पवार विरुद्ध धनराज महाले अशी लढत पहायला मिळणार आहे. पाहूयात नरेंद्र मोदी नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

 1.      तुम्हाला या चौकीदाराला मजबूत करायतं आहे
 2.      दिंडोरीत कमळाचं बटन दाबून आणि नाशिकमध्ये धनुष्यबाणाचं बटन दाबताच तुमचं मत मोदींच्या खात्यात येईल
 3.      आमचं सरकार दलालांचं अस्तित्व समाप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे
 4.      मोदींनी लढाई सुरू केली आहे ती याच दलालांविरोधात 
 5.      तुमच्या समस्येचं कारण शेतकरी नाहीये तर दलाल आहेत
 6.      जर शेतमालाच्या वस्तुंच्या किमती घसरल्या तर शेतकऱ्यांकडे येतात आणि त्यांच्या समस्या दाखवतात मात्र, दलालांना लपवून ठेवतात
 7.      महागाई वाढताच काँग्रेसवाले सर्वसामान्यांकडे जावून त्यांच्या मुलखती घेतात मात्र, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेत नाहीत
 8.      कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी कांद्याच्या वाहतूकीसाठी लागणारा खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
 9.      २३ मे रोजी पुन्हा मोदी सरकार येताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाईल, आताच्या नियमांत बदल केला जाईल
 10.      ज्यांना अद्याप मदत मिळाली नाहीये त्यांना सुद्धा लवकरच मदत मिळेल
 11.      पीएम किसान निधी द्वारे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरूवात झाली आहे
 12.      आदिवासी मुलांच्या अभ्यासासाठी देशभरात एकलव्य मॉडल स्कूल सुरू केले जात आहेत
 13.      देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले
 14.      एकिकडे डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देत आहोत तर दुसरीकडे ग्रामिण भागात पोस्ट ऑफिस, बँकेत आम्ही बदल करत आहोत, बँकेच्या सुविधा ग्रामस्थांच्या घराघरात पोहोचवत आहोत
 15.      एकिकडे आम्ही प्रत्येक गरीबाचं बँकेत खातं उघडून दिलं
 16.      एकिकडे आम्ही वेगाने गावागावात रस्ते बनवत आहोत तर देशातील प्रत्येक घराला वीज उपलब्ध होण्यासाठी मोफत वीज कनेक्शन देत आहोत
 17.      आम्ही देशातील प्रत्येक गरीब परिवाराला प्रत्येकवर्षासाठी पाच लाख रुपयांचा मोफत इलाज करण्याची सुविधा देत आहोत
 18.      आता दहशतवाद्यांना सुद्धा माहिती आहे की, भारतात गैरकृत्य करण्याचा प्रकार केला तर मोदी सरकार सोडणार नाही
 19.      आमची सत्ता येण्यापूर्वी देशात बॉम्बस्फोट होत होते, त्यावेळचं सरकार काय करत होतं?
 20.      बॉम्बस्फोटात निष्पाप नागरिकांचा बळी घेतला गेला
 21.      मोदींनी आपल्या भाषणात श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला
 22.      भारत आज आपल्या समोर असलेल्या संकटांचा निडर होऊन सामना करत आहे
 23.      हे सर्व कशामुळे झालयं? मोदी-मोदी मुळे नाही तर तुमच्या केवळ एका मतामुळे
 24.      अनेकांना वाटलं असेल मी डायलॉग मारला मात्र, आता देशातील प्रत्येक व्यक्ती डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो
 25.      आम्ही डोळ्यात डोळे घालून चर्चा करणार, हे मी २०१३ साली म्हटलं होतं
 26.      पहिल्या दोन टप्प्यातील मतदाना नंतर देशभरातून जो संदेश आला आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील जमीन सरकली
 27.      मी बोलताच विरोधकांना विजेचा झटका लागतो
 28.      वंशवाद, देशाची सुरक्षितता, वंशवाद, देशाचा विकास या मुद्द्यांवर भाष्य करतो
 29.      तुमच्या उपस्थितीमुळे विरोधकांचं बीपी वाढलं असेल
 30.      नाशिकमध्ये येऊन मी धन्य झालो
 31.      सप्तरंग घेऊन नटलेलं नाशिक हे तिर्थक्षेत्र आहे
 32.      सातवा रंग बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला अशा मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा
 33.      सहावा रंग सावरकरांच्या जन्म गावाचा
 34.      पाचवा रंग हनुमान जन्मस्थानाचा 
 35.      चौथा रंग भगवान श्रीरामाच्या वास्तव्याचा
 36.      तिसरा रंग म्हणजे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचा
 37.      दुसरा रंग कुंभमेळ्याचा 
 38.      पहिला रंग सप्तश्रृंगी देवी मातेचा 
 39.      नाशिकचं नाव घेतले तर मला संस्कृतीचे सात रंग दिसू लागतात
 40.      नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात
 41.      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरूवात
 42.      उपस्थितांकडून मोदी-मोदीच्या घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. असं मतदान करा की विरोधी पक्षांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे
 2. नाशिकमध्ये चांगलं परिवर्तन होत आहे
 3. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली
 4. मुद्रा योजने अंतर्गत ४ लाख नागरिकांना कर्ज वाटप
 5. मोदींनी गुगली टाकली आणि शरद पवारांना बारावा खेळाडू बनवलं
 6. मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका
 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन 


लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. आता मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण चार टप्प्यात मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिंडोरीत सभेतील ठळक मुद्दे Description: PM Narendra Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आज दोन जाहीर सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे पार पडली. तर दुसरी जाहीर सभा नंदुरबार येथे होणार आहे.
Loading...
Loading...
Loading...