२०१९ची निवडणूक ही समतेचं प्रतिक: मोदी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 25, 2019 | 23:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज झालेल्या एनडीएच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नेते पदी एकमताने निवड करण्यात आली.

modi_ani
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक, मोदींची एनडीएच्या नेते पदी निवड  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज (शनिवार) एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत एनडीएचे नवनिर्वाचित खासदार आणि अन्य पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीत औपचारिकरित्या नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावाही केला. दरम्यान, याआधी मोदींनी एनडीएच्या बैठकीत नवनिर्वाचित खासदारांना संबोधितही केलं. बैठकीच्या सुरुवातीला मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वाद देखील घेतले. लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी हे ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण लाईव्ह: 

  1. भारतातील जनतेला व्हीआयपी कल्चर अजिबात आवडत नाही, त्यामुळे सामान्य लोकांशी स्वत:ला जोडा: मोदी
  2. दिल्लीतील काही भुरट्या लोकांपासून सावध राहा. खासकरून जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. नाहीतर तुमचंच नुकसान होऊ शकतं: मोदी 
  3. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, मंत्री पदाची निवड ही योग्य व्यक्तींकडूनच केली जाईल, कुणाच्याही बोलण्यावर किंवा मीडियात येणाऱ्या नावांवरही देखील विश्वास ठेऊ नका: मोदी 
  4. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच संसदेत महिलांची संख्या वाढली आहे: मोदी
  5. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युतीचं राजकारण गरजेचं आहे. एका पक्षाला कितीही जागा मिळो अथवा तो कितीही ताकदवान होवो तरीही युती गरजेची आहे. 'युती' हे अटल बिहारी वाजपेयी यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. 
  6. या निवडणुकीतील भारत भ्रमण ही माझ्यासाठी एक पवित्र यात्रा होती: मोदी
  7. जनता आणि सरकारमध्ये एक अतूट विश्वास आहे: मोदी
  8. पाच वर्ष आम्ही नाही तर जनतेनं सरकार चालवलं: मोदी
  9. एकदिलानं काम करणं हे एनडीएचं वैशिष्ठ्य: मोदी
  10. या निवडणुकीद्वारे नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे: मोदी 
  11. भारताची लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे: मोदी 
  12. २०१९ची निवडणूक ही समतेचं प्रतिक: मोदी
  13. आता नव्या उर्जेने कामाला लागू: मोदी
  14. २०१९च्या निवडणुकांनी मनं जोडण्याचं काम केलं आहे: मोदी 
  15. सत्तेचा हव्यास भारतीय जनता कधीही स्वीकारणार नाही: मोदी 
  16. एनडीएतील नेत्यांनी माझी निवड केली, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो को मी देखील तुमच्यापैकी एक आहे: मोदी
  17. भारताची लोकशाही ही दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे: मोदी
  18. सेवाभाव यामुळेच जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला: मोदी 
  19. नरेंद्र मोदींकडून नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन
  20. प्रचंड मोठा जनादेश हा जबाबदारी वाढवणारा आहे: मोदी
  21. देशाता मोठ्या राजकीय बदलाला आता सुरूवात झाली आहे: मोदी

याचदरम्यान उत्तर प्रदेशच्या मथुरामधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हेमा मालिनी म्हणाल्या की, 'मोदीजींनी खूप मेहनत केली आहे. त्यांनी संपूर्ण देशाला प्रभावित केलं आहे. यावेळी मी देखील विजय मिळवला आहे. त्यामुळे मला आनंद वाटतो आहे की, मी माझ्या मतदारसंघात काही चांगली कामं करू शकलो. हेच कारण आहे की, आज मी इथं आलेली आहे.' 

दुसरीकडे अभिनेता आणि नुकताच खासदार म्हणून निवडून आलेला सनी देओल हा देखील एनडीएच्या संसदीय बैठकीला हजर राहिला आहे. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीत पोहचले आहेत. 

दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोमवारी हे आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत जाणार आहेत. जिथून त्यांनी तब्बल ४.७९ लाख मतांनी विजय मिळवला आहे. याचबाबत मोदींनी ट्वीट केलं आहे. 'आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी उद्या गुजरातला जाणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी काशीमध्ये असेल. या महान भूमीतील लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानणार आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी