ज्या पक्षाने जिंकली ही जागा, केंद्रात बनते त्यांचे सरकार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 17:29 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

दिल्लीत लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात जागांवर १२ मेला मतदान पार पडले. तसेच २३ मेला निकाल जाहीर होत आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाबाबत आम्ही येथे तुम्हाला अनोखी गोष्ट सांगणार आहोत.

new delhi candidate
नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार 

नवी दिल्ली: दिल्ली एक असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याबाबत म्हटले जाते की या ठिकाणी ज्या पक्षाने विजय मिळवला त्या पक्षाचे केंद्रात सरकार स्थापन होते. हो, आम्ही बोलत आहोत नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाबाबत. या मतदारसंघात ल्युटियन दिल्ली व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतिहासावर नजर टाकली असता १९५१ पासून १६ लोकसभा निवडणुका आणि दोन पोट निवडणुकांपैकी असे १३वेळा असे घडले आहे. 

या मतदारसंघात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपच्या मीनाक्षी लेखी येथून भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना तिकीट देण्यात आले आहे. तर काँग्रेसने आपले माजी प्रदेशाध्यक्ष आणि २०१४मध्ये याच ठिकाणाहून उमेदवार राहिलेले अजय माकन यांना पुन्हा संधी दिली आहे. आम आदमी पक्षाने या ठिकाणाहून बृजेश गोयल यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात कॅनॉट पॅलेस, करोलबाग, लाजपत नगर, राजिंदर नगर, साऊथ एक्स, मालवीय नगर, पटेल नगर, आरकेपुरम, मोती नगर, ग्रेटर कैलाश आणि दिल्ली कँट या भागांचा समावेश आहे. 

२०१४मधील निवडणुकीत या जागेवरून भाजपच्या उमेदवार मीनाक्षी लेखी यांनी विजय मिळवला होता. त्यांना ४,५३,३५० मते(४७.०२ टक्के) मते मिळाली होती. तर आपचे उमेदवार आशिष खेतान यांना २,९०,६४२ मते(३०.१४ टक्के) मिळाली होती आणि काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना १,८२, ८९३मते(१८.९७टक्के) मिळाली होती. 

२००४ आणि २००९मध्ये जेव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते तेव्हा अजय माकण येथील खासदार होते. १९९८ आणि १९९९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जगमोहन येथून खासदार झाले होते. यावेळेस १२ मेला मतदान झाले. मात्र यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का घटलेला पाहायला मिळाला. येथे ५६.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

निकालासाठी उरलेत अवघे काही तास

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास उरले आहेत. २३ मेला सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे या निकालासाची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र यंदाच्या वर्षी निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काहीसा उशीर लागू शकतो. निवडणुकीचा निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाटही उजाडू शकते. 

एक्झिट पोलमध्येम मोदी सरकार

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजात देशात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काँग्रेसच्या जागांमध्येही वाढ पहायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ज्या पक्षाने जिंकली ही जागा, केंद्रात बनते त्यांचे सरकार Description: दिल्लीत लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात जागांवर १२ मेला मतदान पार पडले. तसेच २३ मेला निकाल जाहीर होत आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाबाबत आम्ही येथे तुम्हाला अनोखी गोष्ट सांगणार आहोत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles