उद्धव ठाकरेंसमोर नेत्यांसह कार्यकर्ते वाचवण्याचं आव्हान; आता नगरसेवकांनाही शिंदे गटाचा ओढा

पक्षातील ४० आमदार फोडून शिवसेना (Shiv Sena) खिळखिळी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देत आहेत.  मंत्री आमदारांना पक्षातून बाहेर नेल्यानंतर आता नगरसेवक (Corporator) सामान्य कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना संभाळण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

In Pune's corporator Shinde's group, Thackeray's tension increased
पुण्यातील नगरसेवक शिंदेंच्या गटात, ठाकरेंचं टेन्शन वाढलं   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील मोठं नाव असणारे नाना भानगिरे हे देखील शिंदे गटात सामील
  • भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता
  • भानगिरे पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत.

पुणे:  पक्षातील ४० आमदार फोडून शिवसेना (Shiv Sena) खिळखिळी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देत आहेत.  मंत्री आमदारांना पक्षातून बाहेर नेल्यानंतर आता नगरसेवक (Corporator) सामान्य कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना संभाळण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात गेले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाना भानगिरे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढली आहे.

आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेते देखील शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता आणि आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे (Nana Bhangire)  हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी पुण्यात शिवसेनेला खिंडार पाडले आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे आता एकनाथ शिंदे गटाला सामील झाले असून शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे.

Read Also : काँग्रेस आमदाराच्या गेस्ट हाऊसवर ACBची धाड,5 ठिकाणी झाडाझडती

नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे भानगिरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.
हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Also : नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे अन् कांदेंचे होणार वांदे

भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता आहे. याचीच फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण देखील दिल्याची माहिती आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी