निवडणुकीत हिंसक घटना, भाजप उमेदवारावर गावठी बॉम्बने हल्ला

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 10:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

ओडिशामधील भुवनेश्वर-मध्य येथील बीजेडी आणि भाजपच्या विधानसभा उमेदवारांवर हल्ला झाला आहे. बीजेडी उमेदवारावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला आहे. तर, भाजप उमेदवाराच्या गाडीवर गावठी बॉम्बने हल्ला झाला आहे.

Odisha bomb attack BJP MLA candidate  Bhubaneswar-Central
भाजप उमेदवारावर गावठी बॉम्बने हल्ला 

भुवनेश्वर: ओडिशामध्ये निवडणुकांना हिंसक वळण लागल असल्याचं दिसत आहे. भुवनेश्वर-मध्य येथून बिजू जनता दल (बीजेडी) पक्षाचे विधानसभेचे उमेदवार आणि भुवनेश्वरचे माजी महापौर अनंत नारायण जेना यांच्यावर हल्ला झाला आहे. रविवारी रात्री हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या नारायण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे विधानसभा उमेदवार जगन्नाथ प्रधान यांच्या सुद्धा गाडीवर गावठी बॉम्ब फेकण्यात आला आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून चौकशीचे मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेता धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, "ओडिशामध्ये निवडणुकीच्या काळात हिंसेच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. भुवनेश्वर-मध्य येथून विधानसभेचे भाजप उमेदवार जगन्नाथ प्रधान यांच्यावर तिसऱ्यांदा हल्ला झाला आहे. त्यांच्या कारवर गावठी बॉम्ब फेकण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे".


तर, भुवनेश्वर सीईओला पाठवलेल्या पत्रात बिजू जनता दल (बीजेडी)ने भाजप नेते धर्मेंद्र प्रधान आणि इतर काहींची लाय डिटेक्टर टेस्ट तसेच नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


देशभरात लोकसभा निवडणुका होत असून या निवडणुकांसोबतच ओडिशामध्ये विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होत आहेत. ओडिशामध्ये २१ लोकसभेच्या जागा आहेत तर १४७ विधानसभेच्या जागा आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण चार टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल आणि चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. तर, निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होतील.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
निवडणुकीत हिंसक घटना, भाजप उमेदवारावर गावठी बॉम्बने हल्ला Description: ओडिशामधील भुवनेश्वर-मध्य येथील बीजेडी आणि भाजपच्या विधानसभा उमेदवारांवर हल्ला झाला आहे. बीजेडी उमेदवारावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला आहे. तर, भाजप उमेदवाराच्या गाडीवर गावठी बॉम्बने हल्ला झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...