Viral Video: हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोक झाले चकित, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर यूजर्सना छोट्या कासवासारखे दिसणारे हे बीटल पाहून भलतेच आश्चर्य वाटत आहे. सोनेरी रंगाची ही छोटी छोटी कासवे लोकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Golden tortoise beetles
हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोक झाले चकित, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडिओ
  • इथे पाहा उडणाऱ्या सोनेरी कासवांचा व्हिडिओ
  • कसा असतो गोल्डन टॉरटॉईज बीटल?

सध्या सोशल मीडियावर (Social media) यूजर्सना (users) छोट्या कासवासारखे (little tortoise) दिसणारे हे बीटल (beetles) पाहून भलतेच आश्चर्य (amazement) वाटत आहे. सोनेरी रंगाची (golden color) ही छोटी छोटी कासवे लोकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत. सामान्यतः कासवे आकाराने बरीच मोठी असतात, पण या व्हिडिओत (video) दिसणाऱ्या कासवांसारख्या जिवांचा आकार फारच लहान आहे. हे खरेतर बीटल्स (beetles) नावाचे किडे (bugs) आहेत ज्यांचा रंग सोनेरी आहे आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. यासोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘अनेकदा जे चमकते तेच सोने असते.' हा बीटल दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतो. लोकांनी गोल्डन टॉरटॉईज बीटल नावाच्या या जिवाला पहिल्यांदाच पाहिले आहे आणि हा कुठे आढळतो याबद्दलचे आणि इतरही तपशील जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

इथे पाहा उडणाऱ्या सोनेरी कासवांचा व्हिडिओ

या व्हिडिओत दिसत आहे की एका इसमाच्या हातात तीन छोटी कासवे म्हणजेच गोल्डन बीटल्स आहेत आणि ते पुन्हापुन्हा आपले पंख पसरत आहेत. या जिवांचे इतके सुंदर रूप क्वचितच कुणी याआधी पाहिले असेल. त्यामुळेच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर आपल्या उत्सुक प्रतिक्रियाही नोंदवत आहेत.

कसा असतो गोल्डन टॉरटॉईज बीटल?

हे चमत्कारिक गोल्डन टॉरटॉईज बीटल्स आकाराने छोटेच असतात. त्यांची लांबी 5 ते 7 सेंटीमीटर असते. त्यांच्या रंगातही वैविध्य आढळते. यापैकी काही बीटल्स लाल किंवा भुऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात तर काही बीटल्स या व्हिडिओत दिसणाऱ्या बीटल्ससारखे चमकदार सोनेरी रंगाचे असातत. यांना गोल्डबग म्हणजेच सोनेरी किडे या नावानेही ओळखले जाते. त्यांना हात लावल्यास त्यांचा रंगही काहीवेळा बदलतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी