बहुमत मिळाल्यानंतर आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी उद्या गुजरातमध्ये, वाराणसीलाही जाणार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 25, 2019 | 16:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता रविवारी आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. तसंच मोदी वाराणसीचा सुद्धा दौरा करणार आहेत.

pm modi and his mother
उद्या मोदी आईचा आशीर्वाद घेणार, काशीला ही जाणार 

Lok Sabha Elections result 2019: लोकसभा निवडणूक २०१९ ला भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. २३ मे रोजी लागलेल्या निकालानंतर भाजपनं बहुमतानं विजयी झाली आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी म्हणजेच रविवारी गुजरातला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला जाऊन आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यासोबतच मोदी त्यांच्या आईसोबत थोडा वेळ घालवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. 

पंतप्रधान मोदी सोमवारी स्वतःचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये जातील. या लोकसभा मतदारसंघात मोदींनी ४.७९ लाख मतांच्या फरकानं निवडणूक जिंकली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं की, आईचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी काशीमध्ये असेन.या महान भूमिच्या लोकांना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानणार आहे. 

 

 

मोठ्या मोदी त्सुनामीच्या आधारावर भाजपनं आपल्या जोरावर ३०३० जागांवर विजय मिळवला. भाजपचा विजय २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या २८२ जागांच्या तुलनेत खूप जास्त आहे. 

भाजपच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. भाजपच्या युतीला एकूण ३५२ जागा मिळाल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास, भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. एनडीएनं गेल्या लोकसभा निवडणुकीत ३३६ जागांवर विजय मिळवला होता. 

काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेस पक्षानं ५२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचं अपयश स्विकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं. 

लोकसभा निवडणूक २०१९मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने अतिशय भरघोस यश मिळवलं. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. २०१४ प्रमाणेच जनतेने काँग्रेसवर फारसा विश्वास दाखवलेला नाही. आता येत्या काही दिवसातच नवं सरकार स्थापन केलं जाईल. तसंच या सरकारच्या मंत्रिमंडळात आता काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता देखील आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १६वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. पुढील सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. राष्ट्रपतींनी देखील त्यांचे राजीनामे हे स्वीकारले. 

१६व्या लोकसभेचा कार्यकाळ हा ३ जून २०१९ रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे १७ व्या लोकसभेचं गठन हे ३ जूनच्या आधी करणं क्रमप्राप्त आहे. नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आता पुढील काही दिवसातच सुरू होईल. पण त्याआधी तीन निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींची भेट घेतील आणि ते नवनिर्वाचित खासदारांची यादी ही त्यांना सोपवतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बहुमत मिळाल्यानंतर आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी उद्या गुजरातमध्ये, वाराणसीलाही जाणार Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता रविवारी आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. तसंच मोदी वाराणसीचा सुद्धा दौरा करणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles