बॉक्स ऑफिसवर ही पंतप्रधान मोदींची कमाल, बायोपिकची धमाकेदार कमाई 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 25, 2019 | 14:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Modi film: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक २४ मे रोजी रिलीज झाला. विश्लेषकांनी हा सिनेमा पहिल्या दिवशी दीड कोटी रूपयांची कमाई करेल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र या सिनेमानं हे आकडे पार केले आहेत.

PM Modi biopic
बॉक्स ऑफिसवर ही मोदींची कमाल, बायोपिकची धमाकेदार कमाई 

PM Modi Biopic box office collection: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकालानं संपूर्ण देशात त्यांच्या नावानं त्सुनामी आल्याचं दिसलं. मोदींच्या त्सुनामीत विरोधी पक्षाचा पूर्णपणे सुफडा साफ झाला. या मोठ्या विजयानंतर संपूर्ण देशात मोदींच्या नावाचा जय जयकार होत आहे. दरम्यान त्यांच्या आयुष्यावर आधारित मोदींचा बायोपिक गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकला होता. तो सिनेमा अखेर २४ मे रोजी रिलीज करण्यात आला. विश्लेषकांनी हा सिनेमा पहिल्या दिवसी दीड कोटी रूपयांची कमाई करेल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र या सिनेमानं विश्लेषकांनी सांगितलेले आकडे ही पार करत पुढची कमाई केली आहे. 

फिल्म विश्लेषकांचा अंदाज होता की, हा सिनेमा पहिल्या दिवशी काही खास कमाई करणार नाही. यापेक्षा अधिक कमाई अर्जुन कपूरचा इंडियाज मोस्ट वॉन्टेड करेल. जेव्हा आता या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईची आकडे समोर आले तेव्हा संपूर्ण अंदाज उलटला आहे. पंतप्रधान मोदींच्या बायोपिकनं पूर्ण देशात जवळपास पाच कोटी रूपयांचं कलेक्शन केलं आहे. तर इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २.१० कोटींचा बिजनेस केला आहे. 

अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास विवेक ओबेरॉयनं ठिक-ठिक अॅक्टिंग केली आहे. मात्र पूर्ण फिल्ममध्ये ही गोष्ट इंप्रेसिव्ह करत नाही. सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली आणि त्यांचा पंतप्रधान बनण्याचा प्रवास यावर फोकस करण्यात आलं आहे. यावेळी दाखवण्यात आलेलं पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विवेकनं आपल्या भाषेत चांगला जोर पकडला आणि मोदींच्या अंदाजात भाषण दिलं. त्यासाठी विवेकला जास्तीची गुण दिले जातील. 

तर याच आठवड्यात सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.  हा सिनेमा खास आहे कारण यात पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू बनण्यापासून ते  मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान बनण्यापर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण कहाणी आहे. हा सिनेमा उमंग कुमार यांनी डायरेक्ट केला आहे. या आधी उमंग कुमार यांनी मेरी कॉम आणि सरबजीत सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.  

या सिनेमात विवेक ओबेरॉय सह सुरेश ओबेरॉय यांनीही भूमिका साकारली आहे. निर्माता संदीप सिंह म्हटले होते, सिनेमात सुरेश ऑबेरॉय यांनी एका संताची भूमिका साकारली आहे. हे एक काल्पनिक पात्र असतानाही खूप महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले, हे पात्र साकारण्यासाठी १००हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेतापेक्षा चांगले कोण असू शकते.

पीएम नरेंद्र मोदी यांच्या सिनेमात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. तर मनोज जोशी अमित शहांची भूमिका साकारली आहे. मोदींची आई हिराबेनची भूमिका अभिनेत्री झरिना वहाब साकारली. तर मोदींची पत्नी जशोदाबेनच्या भूमिकेत बरखा बिष्ट दिसत आहेत. बोमन इराणी यांनी या सिनेमात रतन टाटा यांची भूमिका साकारली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बॉक्स ऑफिसवर ही पंतप्रधान मोदींची कमाल, बायोपिकची धमाकेदार कमाई  Description: PM Modi film: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक २४ मे रोजी रिलीज झाला. विश्लेषकांनी हा सिनेमा पहिल्या दिवशी दीड कोटी रूपयांची कमाई करेल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र या सिनेमानं हे आकडे पार केले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles