पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत ऐतिहासिक विजय, तोडला आपलाच रेकॉर्ड

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 08:21 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी येथील मतदारसंघआतून रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळवला आहे. या जागेवरून मोदींविरोधात तब्बल २७ उमेदवार उभे आहेत.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयासह आपलाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये ४ लाख ७९ हजार ५०५ मतांच्या फरकाने जिंकले आहे. मोदींनी २०१४मध्ये येथून ३,७१,७८४ मतांनी विजय मिळवला होता. मोदींनी दुसऱ्यांदा येथील जनतेने सर्वाधिक ६३.६२ टक्के मते देत विजयी केले. 

मतमोजणीनंतर मोदींनी एकूण ६,७४,६६४ मते मिळवल्याचे समोर आले. तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी (सपा-बसपा-रालोद) उमेदवार शालिनी यादव यांना १,९५,१५३ मते मिळाली. काँग्रेसचे अजय राय यावेळी तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांना १,५२,५४८ मते मिळाली. वारणसी येथून मोदी निवडणूक लढवत असल्याने येथे उमेदवारांची लाट आली होती. या मतदारसंघातून एकूण २७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. 

वाराणसीमध्ये विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेचे आभार मानले. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले, धन्यवाद काशी! या महान भूमीची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळतत आहे. लोकसभेत पुन्हा एकदा काशीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. काशीच्या विकासासाठी आपण सगळे मिळून काम करूये. काशीच्या भाजप कार्यकर्त्यांनी जे कठीण परिश्रम घेतले त्यांचे सगळ्यांचे आभार. 

भाजपने सातव्यांदा मिळवला वाराणसीत विजय 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला असला तर भाजपाचा हा सातवा विजय आहे. गेल्या २८ वर्षांमध्ये वाराणसीमध्ये भाजपचा दबदबा राहिला आहे. दरम्यान, एकवेळेस भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. १९९१मध्ये भाजपमध्ये पहिल्यांदा येथे विजयाची चव चाखली होती. १९९१मध्ये श्रीश चंद्र दीक्षित खासदार बनले होते. त्यानंतर १९९६मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शंकर प्रसाद जयस्वाल यांना मैदानात उतरवण्यात आले आणि त्यांनी दमदार विजय मिळवला. यानंतर शंकर प्रसाद यांनी १९९८ आणि १९९९मध्ये विजय मिळवला. मात्र २००४मध्ये येथील निवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला नाही. २००४मध्ये येथे काँग्रेसच्या डॉ. राजेश कुमार मिश्रांनी त्यांना हरवले. त्यानंतर २००९मध्ये वाराणसी येथून भाजपच्या मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला. तर २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक विजय मिळवला.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत ऐतिहासिक विजय, तोडला आपलाच रेकॉर्ड Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी येथील मतदारसंघआतून रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळवला आहे. या जागेवरून मोदींविरोधात तब्बल २७ उमेदवार उभे आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles