अभिनंदनला काही झालं तर आम्ही तुम्हांला सोडणार नाही- पंतप्रधान

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पाटनमध्ये रॅली संबोधित केली. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणावर पाकिस्तानला धमकी दिली होती असं म्हटलं.

PM narendra modi
म्हणून त्यावेळी मोदींनी दिली होती पाकिस्तानला धमकी   |  फोटो सौजन्य: ANI

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गुजरातच्या पाटनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा संबोधित केली. यावेळी मोदींनी अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणावर पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते असं सांगितलं. पाकिस्ताननं अभिनंदन यांना पकडलं होतं. तेव्हा मी पाकिस्तानला म्हटलं होतं की, जर आमच्या पायलटसोबत काही चुकीचं झाल्यास आम्ही तुम्हांला सोडणार नाही, असं मोदींनी आजच्या सभेत म्हटलं आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई सेनेनं कारवाई करत पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या एअर स्ट्राईकमध्ये ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. 

एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी भारतीय हवाई सेनेचं मिग २१ लढाऊ विमानानं सीमेवर पाकिस्तानचं विमान एफ १६ पाडलं होतं. ते विमान हवाईसेनेचे पायलट अभिनंदन चालवत होते. तेव्हा मिग विमान पीओकेमध्ये कोसळलं. मात्र पायलट अभिनंदन सुरक्षितरित्या बाहेर आले होते. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले होते. भारतानं अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची माहिती दिली होती. 

पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातले संबंध अधिकच ताणले गेले. त्यानंतर पाकिस्ताननं पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी झटकली होती. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. अनेक देशांनी पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यानंतर चर्चा करण्याची मागणी भारताकडे केली होती.

दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला ही सुनावलं. १४ फेब्रुवारीला झालेला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे दस्तऐवज भारताकडून पाकिस्तानकडे सोपवण्यात आली. त्यानंतर ही महत्त्वाची कागदपत्रे पाकिस्तानला सोपवल्यानंतर तिथून येणारी प्रतिक्रीया ही पूर्णपणे निराशाजनक होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं की, पाकिस्तानची वृत्ती ही धक्का देणारी आहे. सर्वांत वाईट म्हणजे पाकिस्ताननं पुलवामा घटना  ही दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यांची माहिती दिली आहे. पाकिस्ताननं पुलवामा घटना ही दहशतवादी हल्ला नव्हती असं म्हटलं आहे. सीमावर्ती जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांबद्दलचा संपूर्ण रिपोर्ट पाकिस्तानकडे सोपवण्यात आला त्यानंतर पाकिस्तानच्या उदासीनतेचा दृष्टीकोन निराशाजनक होती. 

सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे, पुलवामामध्ये झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला होता हे सतत पाकिस्ताननं नाकारालं आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत या हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानमध्ये चालत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाईचा रिपोर्ट आतापर्यंत सोपवला नाही आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अभिनंदनला काही झालं तर आम्ही तुम्हांला सोडणार नाही- पंतप्रधान Description: Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पाटनमध्ये रॅली संबोधित केली. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणावर पाकिस्तानला धमकी दिली होती असं म्हटलं.
Loading...
Loading...
Loading...