PM Modi Akshay Kumar Interview: मोदींच्या मुलाखतीदरम्यान अक्षयनं हे गुपित उलगडलं

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 24, 2019 | 13:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

PM Modi Akshay Kumar Interview: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अक्षयसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आणि अक्षयनं आपलं एक गुपित उघड केलं.

PM Modi and Akshay Kumar
पंतप्रधान मोदींची अक्षयनं घेतली मुलाखत 

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत अक्षय आणि मोदी यांनी दिलखुलासपणे आपल्याबद्दल माहिती दिली. अक्षय कुमारच्या या मुलाखतीत मोदींनी आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या. देशसेवेकडे आपण कसं वळलो, हे मोदींनी अक्षयला सांगितलं. तसंच तुम्हाला पंतप्रधान बनण्याची इच्छा होती का? या अक्षयच्या प्रश्नावर मोदींनी ‘मी पंतप्रधान होईल, असा कधी विचार केला नव्हता’, हे उत्तर दिलं.

यावेळी बॉलिवूडच्या खिलाडीनं आपल्या आयुष्यातील एक गुपित उलगडलं. अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं की, त्याला कधीच चित्रपट अभिनेता व्हायचं नव्हतं. अक्षयनं सांगितलं त्याचं स्वप्न हे मार्शल आर्ट टीचर बनण्याचं होतं.

अक्षय कुमारनं पंतप्रधान मोदींना त्यांच्या रागाबद्दल विचारलं तर अक्षयनं आपण आपला राग कसा नियंत्रित ठेवतो, हे सांगितलं. अक्षय म्हणाला, जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो बॉक्सिंग बॅगला खूप बुक्के मारतो आणि थकून झोपी जातो. याशिवाय कधी राग आल्यास समुद्रकिनाऱ्यावर जातो आणि खूप जोराजोरात ओरडतो.

 

 

मुलाखती दरम्यानच्या काही खास गोष्टी –

  1. मी आंबा खातो आणि मला आंबे आवडतात. कारण मी लहान होतो तेव्हा आंबे विकत घेऊन खायची आमची परिस्थिती नव्हती. मात्र आम्ही शेतात जायचो आणि तिथं झाडावर लागलेले पिकले आंबे खायचो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. मी खूप लहान वयात घर सोडलं होतं आणि म्हणूनच मोह, माया, प्रेम हे सर्व ट्रेनिंग दरम्यान सुटून गेलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  3. मी खूप कडक आणि शिस्तप्रिय आहे, मात्र कधी कुणाला कमी लेखण्यासाठी काम करत नाही. मी नेहमी प्रयत्न करतो जर कोणतं काम करायचं असेल तर त्यात स्वत: लक्ष घालायचं, ते शिकायचं आणि शिकवायचं सुद्धा... मी टीम बनवून जातो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  4. मी कधी विचार केला नव्हता की पंतप्रधान होईल, लहानपणी मला सैन्यातील जवानांकडून प्रेरणा मिळत होती : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  5. विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही चांगली मैत्री आहे, गुलाम नबी आझाद चांगले मित्र आहेत, ममता दीदी दरवर्षी मला दोन कुर्ते गिफ्ट म्हणून पाठवते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  6. जर मला अलादीनचा चिराग मिळाला तर मी म्हणील, जितके समाजशास्त्री आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांच्या डोक्यात हे भरून देईल की, येणाऱ्या पिढीला अलादीनचा चिराग सारखी काही गोष्ट आहे, हे सांगणं बंद करेल, त्यांना मेहनत करणं शिकवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
PM Modi Akshay Kumar Interview: मोदींच्या मुलाखतीदरम्यान अक्षयनं हे गुपित उलगडलं Description: PM Modi Akshay Kumar Interview: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अक्षयसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आणि अक्षयनं आपलं एक गुपित उघड केलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola