खरी मुंबईकर म्हणून शिवसेनेत दाखल : प्रियंका चतुर्वेदी 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 17:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईत माझा जन्म झाला आहे, मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, तसेच मुंबई म्हटले की प्रत्येकाच्या मनात ही शिवसेना असते, त्यामुळे मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यापेक्षा शिवसेनेत केला.

priyanka chaturvedi uddhav thackeray
मातोश्रीवर जाऊन प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला 

मुंबई :  काँग्रेसमध्ये गुंडाना पाठिशी घातले जात असल्याच्या मुद्द्यावरून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत दाखल होण्याचे खरं कारण मीडियाला सांगितले आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. 

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट मुंबई गाठली. त्या शिवसेनेत दाखल होणार अशी शक्यता होती. ती खरी ठरवत त्यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.  मुंबई आणि महाराष्ट्राशी माझे अतूट नाते आहे. मुंबई माझी जन्मभूमीच नाही तर कर्मभूमी आहे.  २००८ मध्ये मी मुंबईत काम करत होते.  पण  मुंबईवर २६/ ११ झाले होते, तेव्हा मला धक्का बसला होता.  त्यामुळे अशा प्रकारचे देशविघात कृत्य होऊ नये म्हणून मुंबईकर म्हणून मी माझे दायित्व स्वीकारले. त्यामुळे मुलांसाठी एक संस्था काढली आणि समाजकारणात आली.  मुंबईने मला सामाजिक भान दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

मुंबईत सुरक्षित आहे. मुंबईत रात्रीत महिला बिनधास्त फिरू शकतात. त्यामुळे जशी सुरक्षित मुंबई आहे, अशाचा दहा ठिकाणी मला मुंबई तयार करायच्या होत्या. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला.  पण आता मी माझ्या मुळाशी येण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

महिला सन्मान, त्याची प्रगती यासाठी मी एका पक्षाला १० वर्ष दिले. मुंबईचे नाव बिनधास्त आहे. मी तशीच वागत होती. पण मला अश्लिल टिप्पणी करत होती, ट्रोल करण्यात होते. बाहेरून आणि पक्षांतर्गत कार्यकर्त्यांनी माझ्यावर अशी टिप्पणी केली. आता त्यांना पुन्हा पक्षात घेते मला दुःख झाले.  मी माझ्या आत्मसन्मानाची लढाई लढत काँग्रेसला रामराम ठोकल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. 

मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझ्या ट्विटर अकाऊंट अनेक टीका केल्या जातील मला ट्रोल केले जाईल.  असा बदल काय आला. सर्व विचार आणि मनाची तयारी करून शिवसेनेत दाखल झाली.  महाराष्ट्र पासून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेला वाढविण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मुंबईतून निवडणूक लढण्याची इच्छा...

मुंबईतून तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही नाराज होत्या. या प्रश्नावर त्या म्हणात्या की,  मला मुंबईतून लढण्याची इच्छा होती, पण काँग्रेस पक्षाचा निर्णय मी मान्य केला. त्यामुळे मी काही पक्ष त्यामुळे सोडला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मथुरातून तिकीट मागितले नाही... 

मथुरातून तिकीट मागितली नाही. मथुरा माझ्या आई वडिलांच्या घर आहेत.   त्या ठिकाणी माझी भावनिक गुंतवणूक आहे. पण मी तिकीट मागितले नव्हते. 

एक चांगली बहिण शिवसैनिकांना मिळाली... 

शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसैनिकांना एक चांगली बहिण मिळाली आहे. त्या लढवय्या आहेत. त्यांच्या या लढवय्या वृत्तीचा आम्हांला फायदा होणार आहे. त्या शिवसेनेला मुंबई, महाराष्ट्र आणि देशात नेणार असतील तर त्यांच्या योग्यतेची जबाबदारी आम्ही त्यांना देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
खरी मुंबईकर म्हणून शिवसेनेत दाखल : प्रियंका चतुर्वेदी  Description: मुंबईत माझा जन्म झाला आहे, मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, तसेच मुंबई म्हटले की प्रत्येकाच्या मनात ही शिवसेना असते, त्यामुळे मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यापेक्षा शिवसेनेत केला.
Loading...
Loading...
Loading...