काँग्रेसची गुगली, या तारखेला मोदींविरोधात भरणार प्रियंका गांधी अर्ज 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 25, 2019 | 23:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस वाराणसीच्या लोकसभा जागेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्यावर गंभीर विचार करत आहे. काँग्रेस २९ तारखेला गुगली टाकण्याची शक्यता

Priyanka Gandhi
प्रियंका गांधी  |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली :  काँग्रेस वाराणसीच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडवं आव्हान देण्याची योजना तयार करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हाय प्रोफाईल सीटसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उमेदवार बनविण्याचा गंभीरतेने विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका २९ एप्रिल रोजी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. काँग्रेसने सध्या २०१४ मध्ये पराभूत काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांची उमेदवारी घोषीत केली आहे. पण ऐन वेळी ही उमेदवारी रद्द करून प्रियंका गांधी यांचा अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे सुमारे अडीच तास रोड शो केला. या रोड शोद्वारे त्यांनी आपली ताकद विरोधी पक्षांना दाखवली आहे. तसेच हे शक्ती प्रदर्शन पाहून काँग्रेस प्रियंकाच्या उमेदवारीबाबत विचार करू शकतात असेही सूत्रांनी सांगितले आहे. 

प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षात सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी वाराणसीबाबत चाचपणी पक्षाकडून सुरू होती. या निवडणूकीसाठी स्वतः प्रियंका गांधी यांनी मोठ्या प्रमाणात तयारी दर्शवली होती. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही या उमेदवारीच्या बाजूने असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पण यूपीएच्या अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या प्रियंका गांधी यांच्या वाराणसीच्या उमेदवारीच्या विरोधात आहे. प्रियंका गांधी यांनी आयुष्यातील पहिली निवडणूक विजयाने सुरू करावी अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी विरोध दर्शविल्याचे सूत्रांकडून समजते. तरी येत्या २९ तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काय निर्णय घेतात याकडे सर्व देशाचे लक्ष लागू राहिले आहे. 

दरम्यान, दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षानेही वाराणसीतील आपला उमेदवार जाहीर केला आहे. या महाआघाडीने शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  प्रियंका गांधी निवडणूक रिंगणात  उतरल्या असत्या तर सप आणि बसपानेही आपला उमेदवार माघारी घेतला असता. आता २९ तारखेलाच समजले की प्रियंका गांधी यांनी जर उमेदवारी अर्ज भरला तर सप आणि बसपा काय भूमिका घेणार आहे.  त्यांनी जर प्रियंका गांधी यांना पाठिंबा जाहीर केला तर मोदींसाठी ही निवडणूक काटे की टक्कर होऊ शकते. 

वाराणसी सीटचा समावेश उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये होतो. यामुळे प्रियंका गांधी यांना या भागाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मोदींना टक्कर देण्याचा विचार काँग्रेसचा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे प्रियंका गांधी हा मोठा आणि प्रभावी चेहरा ठरू शकतो, अशी काँग्रेसची धारणा आहे. 

प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी रायबरेली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करताना विचारले होते की मी वाराणसीतून निवडणूक लढू का?  स्वतः प्रियंका गांधी यांना आपल्या निवडणूक लढविण्याच्या बातम्यांना नकार दिला नव्हता.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९ एप्रिलला प्रियंका गांधी वाराणसीला पोहचतील. सकाळी ८.३० वाजता काळ भैरव यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  या दरम्यान , समाजवादी पक्षाने या हाय प्रोफाइल सीट साठी शालिनी यादव यांना उमेदवार बनविले आहे. पण ही घोषणा झाली तर त्या वाराणसीत पोहचल्या नाही आहेत. असे सांगितले जाते, शालिनी यांना वाराणसी प्रचार न करण्याचे आदेश सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांचा अद्याप प्रचार न सुरू करण्याचा अर्थ राजकीय पंडित लावत आहे. त्यामुळे वाराणसी ही प्रियंका गांधींसाठी सोडल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
काँग्रेसची गुगली, या तारखेला मोदींविरोधात भरणार प्रियंका गांधी अर्ज  Description: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस वाराणसीच्या लोकसभा जागेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्यावर गंभीर विचार करत आहे. काँग्रेस २९ तारखेला गुगली टाकण्याची शक्यता
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola