Priyanka Gandhi: इंदिरा गांधींसोबतच्या तुलनेवर प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 09:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

LS election: प्रियंका गांधींची तुलना नेहमी इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. त्यावर आजपर्यंत प्रियांका गांधी गप्प बसल्या त्यांनी कधीच यावर प्रतिक्रीया दिली नाही. मात्र आता त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Priyanka Gandhi
जेव्हा प्रियांका गांधीची तुलना होते प्रियांका गांधींसोबत  |  फोटो सौजन्य: Twitter

Lok Sabha elections 2019 Priyanka gandhi: प्रियंका गांधी यांना काँग्रेस पक्षाचं सरचिटणीस बनवल्यानंतर पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रियंका गांधी यांची राजकारणात एन्ट्री झाल्याची बातमी समोर येताच रायबरेलीसह अनेक जांगावर काँग्रेस समर्थकांनी जोरदार आनंद साजरा केला. रायबरेलीमध्ये काँग्रेस सर्मथकांनी प्रियंका गांधींच्या समर्थनात काही घोषणा देखील केल्या. प्रियंका गांधी आंधी है, दूसरी इंदिरा गांधी है ( प्रियंका गांधी वादळ आहे. दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत). मात्र माजी उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका यांनी आपली तुलना इंदिरा गांधी यांच्यासोबत केल्यानं नेहमीच शांत बसायच्या. पण यावेळी कानपुरमध्ये एका रोड शोनंतर त्यांनी पहिल्यांदा इंदिरा गांधी यांच्यासोबत झालेल्या तुलनेवर प्रतिक्रीया दिली आहे. 

प्रियंका यांनी शुक्रवारी कानपुरमध्ये काँग्रेस उमेदवार श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या समर्थनात रोड शो केला. त्यावेळी प्रियंका यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. रोड शोनंतर प्रियंका यांनी आपली तुलना आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केल्यानं त्यावर पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली. प्रियंका यांनी म्हटलं की, मी इंदिरा गांधी यांच्या समोर काहीच नाही आहे, मात्र ज्या सेवेची भावना त्यांच्या मनात होती, तिच माझ्या मनातही आहे आणि माझ्या भावाच्या मनात ही आहे. ही गोष्ट आमच्या मनातून कोणीच काढू शकत नाही. आम्ही सेवा करू, तुम्ही संधी द्या किंवा नका देऊ. 

 

 

प्रियंका गांधी यांनी याआधी कधीच यावर बातचीत केली नव्हती. प्रियंका गांधी यांची एन्ट्रीनंतर काँग्रेसच्या लोकप्रियतेत आणखीन वाढ झाली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार झाले आहेत. त्यात निवडणुकीचा तिसरा टप्पा २३ एप्रिलला होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीचे मतदान ७ टप्प्यात होत आहे. त्याच्या अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात १६ राज्यातील ११७ लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. ज्यात एक कानपूर लोकसभेची जागा देखील आहे. तिथे काँग्रेसचे श्रीप्रकाश जयस्वाल निवडणूक लढवत आहेत. 

प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवणार ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेसनं अजूनही वाराणसी मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केला नाही आहे. त्यामुळे वाराणसीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर जेव्हा पत्रकारांनी प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर का काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला वाराणसीतून निवडणूक लढवण्यासा सांगितले तर मी लढवीन. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष मोदींविरोधात वाराणसीमध्ये कोणता उमेदवार जाहीर करतो हेच पाहावं लागेल.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Priyanka Gandhi: इंदिरा गांधींसोबतच्या तुलनेवर प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या Description: LS election: प्रियंका गांधींची तुलना नेहमी इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. त्यावर आजपर्यंत प्रियांका गांधी गप्प बसल्या त्यांनी कधीच यावर प्रतिक्रीया दिली नाही. मात्र आता त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Loading...
Loading...
Loading...