रायगड मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का, सुनील तटकरेंकडून केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा पराभव

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

रायगड लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार अनंत गीते यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना २१००० मतांनी पराभूत केलं आहे.

raigad loksabha election result 2019
रायगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

रायगड :  लोकसभेच्या मतदार संघ पुनर्रचनेत रत्नागिरी मतदार संघाचे नाव बदलून रायगड मतदार संघ झाले. तरी या ठिकाणी अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दबदबा कायम होता. पण लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी २१००० मतांनी शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेसाठी फार मोठा धक्का समजला जात आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील सुनील तटकरे यांनी गीतेंना अत्यंत टफ फाइट दिली होती. त्यावेली गीते हे फक्त २१०० मतांनी विजयी झाले होते. पण यंदा तटकरेंनी मागील पराभवाचं उट्टं काढलं आहे. 

लोकसभा निवडणुकीचे LIVE UPDATES

सुनील तटकरे  (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी 

अनंत गीते (शिवसेना) - पराभूत 

  1. रायगड मतदारसंघात मोठा उलटफेर, सलग सहा वेळा विजय मिळवणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीतेंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंकडून पराभव, तटकरे २१००० मतांनी विजयी. 
  2. अनंत गीते हे ४१०० मतांनी आघाडीवर, सुनिल तटकरे पिछाडीवर
  3. केंद्रीय मंत्री अनंत गीते पिछाडीवर, सुनिल तटकरे आघाडीवर
  4. टपाल मतपत्रिकांची मोजणीला सुरूवात
  5. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात


टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

शिवसेनेचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ गेल्या काही वर्षात यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले हातपाय पसरले आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी लाट होती, तरी या मतदार संघातून विजश्री खेचून आणताना अनंत गीतेंना नाकीनऊ आले होते. अत्यंत थोड्या मत फरकाने गीतेंना विजय मिळाला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीने गेल्यावेळी सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली होती. ती यंदाही कायम आहे. यंदा तटकरेंची नाव पार करून तटाला लावण्यासाठी त्यांना शेकापची साथ मिळाली आहे. त्यामुळे अलिबाग पट्ट्यामध्ये असलेला शेकापचा दबदबा हा तटकरेना फायदेशीर ठरणार आहे. 

मतदान ज्या दिवशी झाले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे कार्यकर्ते खूप सक्रीय होते. त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावलेली यावेळी दिसली. दुसरीकडे गीते यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले होते. पण त्यांना त्या मानाने विकास कामे या भागात आणली असे दिसले नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचा प्रकल्प रायगड याच जिल्ह्यात सर्वात धिम्या गतीने होताना दिसत आहे. त्यामुळे येथील जनतेला मोठ्या प्रमाणाने गैरसोईला सामोरे जावे लागले आहे. त्याचा रागही मतदारांच्या मनात आहे. गीतेंनी कामे केली असतील पण ती लोकांपर्यंत पोहचविण्यात गीते कमी पडल्याचे दिसले.  

गीतेंच्या बाजून एक गोष्ट होती ती जात पण त्यांच्या विरोधातील रोष पाहता हा फॅक्टर इतका प्रभावी ठरलेला दिसत नाही.

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रायगड मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का, सुनील तटकरेंकडून केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा पराभव Description: रायगड लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार अनंत गीते यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना २१००० मतांनी पराभूत केलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles